बीड, जिल्ह्यात मागिल महिनाभरात जालेल्या अतिवृष्टीमूळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचढ नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे परंतु महाराष्ट्रातील आघाडी सरकारने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही उलट महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील इतर जिल्ह्यना मदत देण्याचे मान्य केले परंतु बीड जिल्हा मात्र मदतीच्या यादीतून वगळला आहे . मागिल वर्षी जालेल्या नुकसानीची देखील मदत मिळालेली नाही , पीक विमा देखील मिळालेला नाही . बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणीचा केवळ नाटक केले असून शेतकऱ्यांना वारीवर सोडले आहे म्हणून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यावर होत असलेल्या सततच्या आस्मानी आणि सुलतानी अन्याला वाचा फोडण्यासाठी व आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंढे व बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ . प्रितमताईं मुंढे ,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के आ. लक्षमन पवार , आ. सुरेश धस ,आ.नमिताताई मुंदंडा , भिमसेन धोंडे ,रमेश आडसकर,मोहनराव जगात या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व जनतेने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रा देविदास नागरगोजे यानी केले आहे. प्रा देविदास नागरगोजे जिल्हा सरचिटणीस भाजपा,बीड.
पंकजाताईच्या उपस्थितीत होणाऱ्या बीड जिल्हा भाजपाच्या धरणे आंदोलनात सहभागी व्हा -प्रा देवीदास नागरगोजे
