Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढवा,सीईओ अजित पवार यांचे आरोग्य विभागाबरोबरच शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकार्‍यांना आदेश


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : कोविड 19 मिशन कवच कुंडल अंतर्गत जिल्ह्यात लसीकरणाचे काम गतीने करा, असे आदेश सीईओ अजित पवार यांनी आरोग्य विभागाबरोबरच दोन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे जिल्ह्यात नक्कीच लसीकरणाला गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
कोविड -19 मिशन कवच कुंडल अंतर्गत जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत असून लसीकरणाचे प्रमाण हे अत्यल्प आहे. संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरीकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक असुन 18 वर्षावरील 46 टक्के नागरीकांचे लसीकरण झाले असून 56 टक्के उर्वरीत नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता मोठया प्रमाणात जनसहभाग व जनजागृती होणे गरजेचे आहे. याकरीता गावपातळीपर्यंत ग्रामसेवक , शिक्षक , अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य आरोग्य विभागाला मिळणे अत्यंत आवश्यक आहे . तरी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात लसीकरण सत्र आयोजित करून नागरिकांच्या चेलळश्रळीरींळेप करीता सरपंच , ग्रामसेवक , शिक्षक , अंगणवाडी सेविका यांनी आशा स्वयंसेविका यांना सहकार्य करावे, आरोग्य सेविका या लसीकरणाचे काम करण्यात व्यस्त असल्याने जनजागृती व लोकसहभाग इ . गोष्टीसाठी इतर विभागातील कर्मचार्‍यांना कोविड 1 9 लसीकरणासाठी सहकार्य करावे, लसीकरण सत्राचे नियोजन करतांना प्रा . आ . केंद्र निहाय उपकेंद्र निहाय गावनिहाय उद्दिष्ट झालेले काम व एकही लसीकरण सत्र आयोजीत न झालेली गावे यांची माहिती तयार करून अशा गावांमध्ये प्राधान्याने लसीकरण सत्र आयोजीत करावीत आरोग्य संस्थेव्यतिरिक्त गावांमध्ये लसीकरण सत्र आयोजीत करतांना शासकीय इमारत जसे की, शाळा , अंगणवाडी ग्रामपंचायत जे की विविध मार्गदर्शक सूचनाप्रमाणे असतील, अशा ठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करावे, गावामध्ये लसीकरण सत्र आयोजीत करतांना गावातील संरपंच, ग्रामसेवक , तलाठी , आशा , अंगणवाडी कार्यकर्ती यांना पूर्व कल्पना दयावी व त्यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, ज्या भागात लसीकरणाचे काम कमी आहे , त्या भागामध्ये व्यापक जनजागृती व प्रसिद्धी तसेच लसीकरणाचे महत्त्व विशद करण्यात यावे व लसीकरणाबाबतचे गैर समज याबद्दल नागरिकांचे प्रबोधन करण्यात यावे, लसीकरण सत्राच्या ठिकाणी स्वयंसेवी संस्था बचत गट , नेहरू युवा केंद्र , नवरात्र महोत्सव इ.ची मदत घ्यावी, सर्वच लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण होण्यासाठी विविध धर्माच्या धर्मगुरुंची बैठक आयोजित करुनः त्यांची मदत घेण्यात यावी, प्रत्येक गावामध्ये एक कोविड लसीकरण सनियंत्रण समिती स्थापन करून यामध्ये ग्रामपंचायत सदस्य , पोलिस पाटील , गावातील प्रतिष्ठित नागरीकांचा समावेश असावा अशीच समिती वार्ड / प्रभाग स्तरावर करण्यात यावी, या समितीने सत्राची पूर्वतयारी सत्राचे नियोजन व सनियंत्रण करावे व जास्तीत जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण पुर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, लसीकरणाच्या दिवशी लाभार्थ्यांना बोलाविण्यासाठी गावातील स्वयंसेवक , अंगणवाडी कार्यकर्ती व्ही . एच.एन.एस.सी.चे सदस्य यांना जबाबदारी देण्यात यावी, लसीकरण सत्रामध्ये प्राधान्यक्रमाने गरोदर माता , स्तनदा माता , दिव्यांग व्यक्ती , अंथरुणात खिळलेले रुग्ण , तृतीय पंथी व्यक्ती , वृद्धाश्रम येथील वृद्ध यांचे शासकीय नियमावलीनुसार लसीकरण करण्यात यावे, लसीचा वापर योग्य प्रकारे करुन कमीत कमी लस वाया जाईल याबाबतची दक्षता घेण्यात यावी, लसीकरण सत्र संपल्यानंतर सर्व अचूक माहिती ऑनलाईन संगणक प्रणालीवर, भरली जाईल याची नोंद घ्यावी, सदरील सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश सीईओ अजित पवार यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

Exit mobile version