Site icon लोकाशा-बंब न्यूज

विजेचा शॉक लागून सालगड्याचा मृत्यू; ममदापूर पाटोदा येथील घटना

अंबाजोगाई : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या सालगड्यास विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) दुपारी तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे घडली. जनार्दन तुकाराम जोगदंड ( वय ४०) असे मयत झालेल्या सालगड्याचे नाव आहे.
ममदापूर येथील रहिवासी असलेले मयत जनार्दन जोगदंड हे गावातील अशोक बुरगे यांच्या शेतात दोन वर्षापासून सालगडी म्हणून काम करीत होते. सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान तेरगुळा मळा या शिवारात असलेल्या अशोक बुरगे यांच्या शेतात ते गेले होते. बाजूचा शेतकरी जनार्दन जोगदंड यांना भेटण्यासाठी आला असता जोगदंड हे विहिरीजवळ जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासून जोगदंड यांना मयत घोषित केले. जनार्दन जोगदंड यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Exit mobile version