Site icon लोकाशा-बंब न्यूज

मिसाळवाडी येथे विज पडुन नवतरुण युवक ठार,डोंगरकिंन्ही परिसरात हळहळ व्यक्त

अंमळनेर ( लोकाशा न्युज ) पाटोदा तालुक्यातील डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथे विज पडुन एक युवक जागीच ठार झाला असुन विज अंगावर पडून ठार झालेल्या युवकाचे नाव हे शिवराज गोविंद चव्हाण वय वर्षे सोळा असे आहे यामुळे डोंगरकिंन्ही मिसाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे .

डोंगरकिंन्ही जवळ असणाऱ्या मिसाळवाडी येथील शिवराज गोविंद चव्हाण हा युवक व अंकुश सोनाजी चव्हाण वय 55 वर्षे हे मिसाळवाडी शिवारात असणाऱ्या गवळवाडी माळरानावर गुरे चारण्यासाठी शनिवारी गेले होते याच वेळी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास आचानकच विजांचा कडकडाट सुरु झाला याच वेळी शिवराज गोविंद चव्हाण या युवकाच्या अंगावर विज कोसळली यात गोविंद चव्हाण या युवकाचे जागेवरच निधन झाले .

मिसाळवाडी येथील विज पडून ठार झालेला युवक शिवराज गोविंद चव्हाण हा अकरावीच्या वर्गात पिंपळवंडीत येथे शिक्षण घेत होता ज्यावेळी विज पडली त्यावेळी अंकुश सोनाजी चव्हाण हे वयोवृद्ध देखील त्या युवका सोबत होते परंतु नशिब बलवत्तर म्हणून अंकुश सोनाजी चव्हाण हे बालंबाल वाचले .

मिसाळवाडी येथील विज पडुन ठार झालेल्या युवकाच्या कुटुंबाला आर्थीक मदत देण्याची मागणी पाटोदा तालुक्यातुन होत आहे विज पडून ठार झालेला गोविंद चव्हाण या युवक धार्मिक प्रवृत्तीचा होता त्याने आळंदी येथे पखवाज वादनाचे धडे देखील घेतले होते यामुळे तो डोंगरकिंन्ही परिसरात उत्तम पखवाज वादक म्हणून देखील प्रसिद्ध होता .

Exit mobile version