Site icon लोकाशा-बंब न्यूज

उत्कृष्ट कार्याबद्दल सीईओंनी चंद्रकांत पांडव यांना केले सन्मानित


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकार्‍यांचे स्विय सहाय्यक तथा सांखिकी विस्तार अधिकारी म्हणून चंद्रकांत पांडव यांचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे. याचीच दखल घेवून चार ऑक्टोबर रोजी पांडव यांना सीईओ अजित पवार यांनी सन्मानित केले आहे.
चंद्रकांत पांडव सदर पदावर आजतागायत अव्याहत कार्यरत राहून व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त अपिल अधिनियम 1964, 1967 मधील तरतूदींचा व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम 2016 मधील तरतूदींचा योग्य तो उचित सन्मान ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजानिमित्त भेट देणार्‍या दिव्यांग व्यक्ती व इतर अभ्यांगतांच्या प्रती सद्भावना ठेवून योग्य ते विशेष प्रशासकिय सहाय्य केल्याने त्यांना चार ऑक्टोबर 2021 रोजी शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या विनंतीस अनुसरून आयोजित शासकिय बैठकीत जिल्हा परिषदेचे सीईओ नियुक्ती प्राधिकारी अजित पवार यांच्या हस्ते विशेष बाब म्हणून चंद्रकांत पांडव यांना सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version