Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोकाशाचा अंदाज खरा ठरला, जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळास आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ


बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्च एप्रिल मध्ये झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळातील ११ जागा रिक्त राहिल्या होत्या . त्यामुळे बँकेवर उपायुक्त अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते . त्याची सहा महिन्याची मुदत संपत असतानाच आता राज्य शासनाने या प्रशासक मंडळाला आणखी सहा यांची मुदतवाढ दिली आहे .

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मार्च एप्रिल मध्ये निवडणूक झाली होती . मात्र सोसायटी मतदारसंघातील ११ जागा रिक्त राहिल्या होत्या . त्यामुळे नविन संचालक मंडळ अस्तित्वात येऊ शकले नव्हते . परिणामी राज्य सरकारने बँकेवर उपायुक्त अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय प्रशासक नेमले होते . या प्रशासक मंडळाची सहा महिण्यांची होती . ती ६ ऑक्टोबरला संपत होती .

प्रशासक मंडळ नियुक्तीनंतर राष्ट्रवादीतील एका नेत्याला यातिल काही व्यक्ती नकोसे झाल्याचे चित्र होते . त्यामुळे प्रशासक मंडळ बदलावे यासाठी त्यांचाच आटापिटा सुरु होता . अगदी विद्यमान प्रशासकांच्या अडचणी कशा वाढतिल यासाठी देखिल मागच्या काळात या नेत्यांनी प्रयत्न केले होते . एकेकाळी सहकारावर ‘ राज्य ‘ केलेले असल्याने शिखर बँकेतूनही जिल्हा बँकेच्या अडचणी वाढविण्याचे प्रयत्न झाले होते . यासर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा विद्यमान प्रशासक मंडळालाच सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे .

Exit mobile version