किल्लेधारूर ता.०३(बातमीदार)
धारूर माजलगाव व वडवणी तालूक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे हात चे पुर्णपणे खरीप पिक गेलेले असताना महसुल प्रशासना ने ५० टक्के पेक्षा जास्त अणेवारी चुकीची दिली आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे हि चुकीची आणेवारी तात्काळ रद्द करावी नसता प्रशासनाचे चुकीचे धोरणा विरूध्द तिंव्र स्वरूपाचे अंदोलन करण्याचा इशारा माजलगाव मतदार संघाचे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर यांनी दिला आहे.
यावर्षी कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे हातचे खरीपाचे पुर्ण पिक गेले आहे.गेल्या चाळीस वर्षातील सर्वांत मोठी हि अतिवृष्टी असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन हे तर पुर्ण हातचे गेले आहे. हि गंभिर परीस्थीती असताना शासनाने तात्काळ या नुकसानी ची नुकसान भरपाई म्हणूण हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी आशी मागणी होत असताना महसूल प्रशासनाने माञ माजलगाव , धारूर, वडवणी तिन हि तालूक्यातील अणेवारी पन्नास टक्के पेक्षा जास्त देऊन चुकीची माहीती दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार असून या चुकीचे माहीती मुळे शासनाचे मदती पासून शेतकरी वंचित राहाणार आहेत. त्यामुळे गंभिर परीस्थीतीचा विचार करून हि चुकीची आणेवारी तात्कळ रद्द करावी तात्काळ या शासनाने हेक्टरी पन्नसा हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी आशी मागणी माजलगाव मतदारसंघाचे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.