जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावुन दाखवल्यानंतर खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी राष्ट्रीय महामार्गावर आपला मोर्चा घेवुन जाताना तब्बल 11 महामार्ग बीड जिल्ह्यातुन वळवले. अर्थात भाजप नेत्या पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखाली. एवढ्यावर गप्प न बसता हा जिल्हा दळणवळणाच्या दृष्टीने देशाच्या नकाशावर गेला पाहिजे हे लक्ष डोळ्यासमोर ठेवुन बीड- जामखेड-नगर हा रस्ता मार्गी लावण्याची मागणी त्यांनी अनेकदा लावुन धरली. अर्थात प्रितमताईनं सांगितलं आणि गडकरीनं नाही म्हटलं असं होतच नाही. काल नगर जिल्ह्यात एका रस्ता पुलाच्या उद्घाटनासाठी मंत्री गडकरी आले असताना जाहिर कार्यक्रमात त्यांनी सुरत-कर्नाटक रस्त्याची घोषणा करताना नगर-जामखेड-बीड या रस्त्याला मंजुरी दिल्याचं सांगितलं. हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर वैभवात भर निश्चित पडेल. पण दळणवळणाच्या दृष्टीने बीडकरांच्या अत्यंत सोयीचा रस्ता म्हणावा लागेल.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख खात्या अंतर्गत रोडकरी ज्याप्रमाणे अनेक वर्षापासुनची आहे. तसं आता जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. कारण मागच्या पाच वर्षात त्यांनी दळणवळण हाच विषय ध्यानीमनी घेत वर्षानुवर्षे मागणी असलेला रेल्वेचा प्रश्न मार्गी लावुन दाखवला. भगिनी पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या प्रश्नावर लक्ष घालताना यश प्रचंड मिळालं. कदाचित पुढच्या वर्षात नगरहुन निघालेली रेल्वे वैद्यनाथाच्या पायरीला येवु शकते. दुसर्या बाजुने जिल्ह्यातुन नाही म्हटलं तरी 11 राष्ट्रीय महामार्ग त्यांनी घालवले. ज्यामध्ये अहमदपुर-केज-मांजरसुंबा-जामखेड तर उमरगा-लातुर-रेणापुर-पानगाव-परळी- इंजेगाव-सोनपेठ-जालना, मेहकर-माजलगाव-धारूर-केज-पंढरपुर असे अनेक रस्ते ज्यामध्ये काही कामं पुर्ण झाली. काही प्रगतीपथावर तर काही प्रस्तावित आहेत. परळी-अंबाजोगाई-लातुर हे झालेले रस्ते पाहिल्यानंतर आपण बीड जिल्ह्यात आहोत का?हा प्रश्न आता मनाला विचारावा लागतो. परळी-बीड यालासुद्धा प्रस्तावित मंजुरी आल्याचं कळतं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाण्यासाठी रस्ते जात आहेत. पण बीड-जामखेड-नगर या रस्त्यावर अनेक वर्षापासुनची मागणी नागरिकांची होती. दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. खा.प्रितमताईंना काही दिवसापुर्वी दिल्लीत रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट देवुन या संदर्भात चर्चा आणि निवेदन दिलं. खरं तर कुठल्याही कामासाठी एक पत्र प्रितमताईचं रस्ता मार्गी लागला हे आता समीकरणच होवुन बसलं. काल नितीनजी गडकरी नगर जिल्ह्यात आले असता त्यांनी जाहिर भाषणातुन या रस्त्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली. खरं तर गडकरी आणि मुंडे भगिनींचं अभिनंदन करावं तेवढं कमीच. अत्यंत कामाचा रस्ता मार्गी लागला म्हणावा लागेल. मुंबई-पुणे-कल्याण-नाशिक एव्हाना गुजरातमध्ये जाण्यासाठी सुद्धा हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे. कारण नगरहुन जो रस्ता नाशिक-सुरत आणि इकडे कोल्हापुर जात आहे. त्या पार्श्वभुमीवर मंजुर केलेला बीडचा रस्ता भविष्यात दळणवळण त्या मार्गाला जोडेल तेव्हा रस्त्याची किंमत कळेल. बाकी काही असलं तरी प्रितमताईची या मतदारसंघात लोकप्रियता यासाठीच आहे की त्यांनी जिल्ह्याच्या विकासात घेतलेली यशस्वी झेप.