Site icon लोकाशा-बंब न्यूज

मांडवगण येथील ग्रामसेवकांच्या ‘ डेथ बॉडीचा ‘शोध अद्यापही लागेना; आठ दिवस लोटले शोधकार्य सुरुच 

अंमळनेर -अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी 24 सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी पाच ते सहाच्या सुमारास पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील दरीत आत्महत्या केली परंतु शुक्रवारी या घटनेला आठ दिवस झाले तरी त्यांची डेथ बॉडी मिळून आलेली नाही यामुळे आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकांची डेथ बॉडी गेली कुठे ?असा प्रश्न निर्माण झाला आहे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले आत्महत्या केलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते त्यांनी पाटोदा तालुक्यात घेऊन सौताडा येथील दरीत येऊन आत्महत्या कशामुळे केली ? कि कोणाच्या जाचास कंटाळून केली ? कि त्यांना कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडले या सर्व बाबी तपासून या प्रकरणाचा बारकाईने तपास हा पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे पाच दिवसांपासून करत आहेत.
मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांचे प्रेत हे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सापडले नव्हते सौताडा येथील दरी मोठ्या प्रमाणात खोल आहे त्यातच पाऊस देखील पडून गेलेला असल्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढला आहे यामुळे ग्रामसेवकांची डेथ बॉडी सापडणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे ? श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक गवांदे यांनी सौताडा दरीत आत्महत्या करुन आठ दिवस लोटले आहेत परंतु अद्यापही त्यांची बॉडी सापडली नाही यामुळे हि शोध मोहीम अशीच सुरु रहाणार असल्याची माहिती पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील व सौताडा बिट अंमलदार सुनिल सोनवणे यांनी दिली .

Exit mobile version