Site icon लोकाशा-बंब न्यूज

महात्मा गांधी जयंती निमित्त भाजपाच्या तिरंगा यात्रेस प्रशासनाची मनाई,सत्ताधाऱ्यांचा प्रशासनामार्फत विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी

2 ऑक्टोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने
बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीड शहरात तिरंगा यात्रा आयोजित केली होती. या तिरंगा यात्रेतून आत्मनिर्भर भारत हा संकल्प जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोर महापुरुष महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने या यात्रेचे आयोजन केले होते दुर्दैवाने या राष्ट्रीय उन्नतीला चालना देणाऱ्या कार्यक्रमास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली .
सत्ताधाऱ्यांच्या ईशाऱ्यावर प्रशासनाकडून विरोधकांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्यक्रमात खोडा घालण्याचा हा निर्णय अत्यंत खेदजनक असून सत्ताधाऱ्यांच्या ईशाऱ्यावर विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात विश्वविख्यात लोकप्रिय नेते व देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान राबवले जात आहे.
या अभियानांतर्गत मोदीजींच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत,लोकल फोर वोकल,
हे अभियान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी संपूर्ण संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवले जात आहे. या अनुषंगाने लोकनेते पंकजाताई गोपीनाथ राव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरील महात्मा गांधींजींच्या पुतळ्यापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात येणार होती. यासाठी पोलीस प्रशासनाकडे रितसर अर्जाद्वारे परवानगी मागितली होती. विनंती करूनही पोलीस प्रशासनाने 144 कलम पुढे करून या तिरंगा यात्रेस परवानगी नाकारली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे.
कारण जिल्ह्यामध्ये 14 ऑगस्ट 2021 पासून 144 कलम लागू आहे.परवा बीड शहरात पुनर्वसनमंत्री वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी मेळावा झाला. हजारो लोक तेथे उपस्थित होते.परळी मध्ये जलसंपदा मंत्री आले . तिथे ही हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने पालकमंत्र्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले गेले. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष यांनी परीवार संवाद यात्रा बीड परळी गेवराई माजलगाव काढून तेथे मेळावे संपन्न झाले.
हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. 144 कलम लागू असताना सत्ताधारी नेते व मंत्र्यांचे कार्यक्रम हजारोच्या संख्येने व कर्तव्यदक्ष पोलिसांच्या साक्षीने संपन्न होतात. तर दुसरीकडे विरोधकांच्या प्रत्येक कार्यक्रमास आंदोलनास आडकाठी घातली जाते.
मागील दसरा मेळाव्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे सावरगाव येथे आल्या होत्या.स्वतःहुन लोक आले होते. त्यावेळी ही पोलिसांनी जाणीवपूर्वक काही लोकांवर गुन्हे नोंद केले
या वर्षभरात माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवर आंदोलनाची 32 गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील पोलीस प्रशासन विरोधक आणि सत्ताधारी यांना समान वागणूक देत नाही. प्रत्येक वेळी विरोधकांच्या कार्यक्रम, आंदोलनात खोडा घालून विरोधकावर अन्याय करत आहे. सत्ताधारी नेत्यांच्या ईशाऱ्यावर विरोधकांच्या प्रत्येक कार्यक्रम उपक्रम आंदोलनात खोडा घालून विरोधकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या दबावाला आडकाठीअथवा दबावाला भीक घालणार नाही. सत्ता धारी नेतेमंडळींनी आपल्या सत्तेची पावर जनतेच्या कल्याणासाठी वापरावी आपले वजन अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना भरीव मदत देण्यासाठी वापरावे. अशाप्रकारे विरोधकांवर अन्याय करण्यासाठी वापरू नये पोलीस प्रशासनाने ही सर्वांना समान पातळीवर न्याय द्यावा अन्यथा हा असंतोष रस्त्यावर प्रकट करावा लागेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिला आहे.

Exit mobile version