Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुराच्या पाण्यात बुडून आपेगाव येथे ९५ पशूंचा मृत्यू

अंबाजोगाई: मांजरा नदीला आलेला पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील आपेगाव येथे ९५ पशुंचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाणी ओसरल्यानंतर बुधवारी ( दि.२९) हे पशु शेतात व इतरत्र मयत अवस्थेत आढळून आले. या मयत पशुंचा पंचनामा पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आला.
मांजरा धरणाची सर्व दरवाजे उघडल्याने आपेगाव परिसरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. हे पाणी अर्धे आपेगावात घुसल्याने अनेक लोकांच्या घरासह शासकीय कार्यालये पाण्यात होती. पाण्यात अडकलेल्या १८ नागरिकांना वाचविण्यात यश आले. परंतु पाण्यात बुडणाऱ्या पशूंना वाचवीण्यास यश आले नाही. यामुळे पुराच्या पाण्यात बुडून ९५ पशूंचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर शेतात व इतरत्र हे पशु मयत अवस्थेत आढळून आले. या मयत पशूंचा पंचनामा पशुधन विकास डॉ. अधिकारी अनिल केंद्रे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. कोकणे व डॉ. पी. आर. धनवे यांनी केला.
पशुचा प्रकार मयत संख्या बैल ०१, गाय १५, म्हैस २०, शेळी ०३, मेंढी ०३, कुत्रा ०३, कोंबडी ५० असे एकूण 95 पशूंचा निधन झाले आहे.

I
Exit mobile version