Site icon लोकाशा-बंब न्यूज

पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करावी- ॲड. सुभाष राऊत


बीड / प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील पारनेर येथील पारधी वस्तीवर हल्ला करुन, लहान बालकाची हत्या करणा-या जातीवाद्यांना तात्काळ अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी केली आहे.
पारनेरच्या पारधी वस्तीवर येथील जातीयवादी गुंडांनी केलेला हल्ला हा पुर्व नियोजित असून, पारध्यांची घरे जाळून संसारोपयोगी साहित्याची नासधूस केली आहे. जातीयवादी गुंडाच्याच्या हल्ल्यात सिद्धांत अरुण काळे या बालकाचा खून करण्यात आला असून, जातीयवाद्यांना आणखी काही पारध्यांचे मुदडे पाडावयाची होती. या हल्ल्यात आठ ते दहा जण गंभीर झाले असून यातील एका जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पारधी वस्तीवरील लोक भयभीत असल्याने या वस्तीला पोलिस संरक्षण देण्यात यावे, हल्लेखोर सर्व जातीयवाद्यांना अटक करण्यात यावी, सदरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून हल्लेखोरांवर कठोर शिक्षा देण्यात यावी, येथील पारध्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे आदी मागण्या समता परिषदेचे मराठवाडा तथा बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version