बीड दि.26: स्वयंअर्थसहाय्यीत शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची आरक्षण संवर्गाची आणि शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या माहितीची लिंक भरावी. लिंक भरण्याची माहिती वेळेत सादर न केल्यास आरटीई शुल्क प्रतिपूर्ती अनुदान वितरीत केले जाणार नाही. तसेच अनुसुचित जाती आयोगाच्या मार्फत संबंधित शाळा व्यवस्थापनावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.)श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दि.6 सप्टेंबर रोजी सर्व शाळा व्यवस्थापनाला विहित नमुन्यात माहिती भरून शिक्षकांच्या वेतनाबाबत शिक्षकनिहाय लिंक भरणे बाबत आदेशीत करण्यात आले आहे. अचुक माहिती सादर करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले आहे.
विहित नमुन्यात माहिती सादर व्हावी यासाठी दि.23 सप्टेंबर 2021 रोजी अंबाजोगाई येथे 5 तालुक्यांची आणि बीड येथे 6 तालुक्याच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत करोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांच्या परिस्थितीनुसार फिस साठी सक्ती करू नये, तसेच 50 टक्के पर्यंत फी माफीची सवलत शाळांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी या बैठकीत मुख्याध्यापकांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भगवान सोनवणे, हिरालाल कराड, गौतम चोपडे, तुकाराम पवार, राहुल चाटे, अविनाश गजरे यांची उपस्थिती होती.