Site icon लोकाशा-बंब न्यूज

डीएसओंचा दणका, ‘ते’ राशन दुकान केले तडकाफडकी निलंबित, सहा महिन्यापासून राशन मिळत नसल्याने नागरिकांनी सुरू केले होते जलसमाधी आंदोलन


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : मागच्या सहा महिन्यांपासून हक्काच्या राशनसाठी लढा देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर खडकी घाट तांदळवाडीघाट येथील नागरिकांनी सोमवारी तांदळवाडी येथील तलावात जलसमाधी आंदोलन सुरू केले होतेे जिल्हाधिकारी येईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे बाळासाहेब मोरे यांनी स्पष्ट करीत या दुकानदाराला पाठीशी घालणार्‍या प्रशासनाला शिव्या घातल्या. विशेष म्हणजे या दुकानदाराचे पंधरा दिवसापूर्वी ग्रामस्थांनी काळ्याबाजारात जाणारे रात्रीच्यावेळी धान्य पकडले होते मात्र पोलीस आणि महसूल प्रशासन गप्प बसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत. अखेर जिल्हाधिकार्‍यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला आहे.

Exit mobile version