Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू, धारूर तालुक्यातील घटना


धारूर, दि. 27 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील चिंचपूर येथील दुचाकीवरील दोघे ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने रविवारी रात्री वाहून गेले. दरम्यान, एकाचा मृतदेह रविवारी रात्री उशिरा तर एकाचा सोमवारी सकाळी आढळून आला.

महादेव सोनवणे (45) व उत्तम सोनवणे अशी मयतांची नावे आहेत. धारूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला.यामुळे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे. यातच रविवारी रात्री पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरुन जाणारे दोघे जण वाहून गेल्याची घटना चिंचपूर रस्त्यावर घडली. ग्रामस्थांनी रविवारी रात्री महादेव सोनवणे (45) यांचा मृतदेह शोधला. तर उत्तम सोनवणे यांचा मृतदेह सोमवारी सकाळी सापडला. धारुर ते चिंचपूर रस्त्यावर खारीचा पुल म्हणून ओळखला जाणार्‍या ओढ्याला रविवारी अतिवृष्टीमुळे पुर आलेला होता. रविवारी रात्री या पुलावरुन केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव सोणवने व उत्तम सोनवणे त्यांच्या दुचाकीवरुन क्र. (एम.एच. 44 एन. 7829) जात होते. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह दोघे वाहून गेले. घटनास्थळी धारुर पोलिस व ग्रामस्थांनी रविवारी रात्री मदतकार्य सुरु केले. सदरील पुल हा नेहमीच पावसात पाण्याखाली जातो. हा परिसर वाण नदीचे पाणलोटक्षेत्र असून खारी म्हणून ओळखला जातो. या ओढ्याला पाणी आल्यावर तासन् तास वाहतूक खोळंबते. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
Exit mobile version