आष्टी, दि. 27 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील आष्टा ह.ना.येथील एका शेतकर्याने बाजारात उडीद विकला.त्यांचे 25 हजार रुपये आले हे पैसे घेऊन घराकडे जात असताना चोरट्याने त्यांच्या पैशाचा बॅगवर डल्ला मारला आणि रक्कम लंपास केली. या प्रकारानंतर तणावात आलेल्या शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.दि.26 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली.
कांतीलाल बाबासाहेब गळगटे (59, रा.हरीनारायण आष्टा ता.आष्टी) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील उडीद बाजारात विकला.त्यांचे 25 हजार रुपये आले होते. हे पैसे घेऊन कांतीलाल हे घराकडे जात असताना चोरट्याने त्यांच्या पैशाचा बॅगवर डल्ला मारला आणि रक्कम लंपास केली. या प्रकारानंतर तणावात आलेल्या कांतीलाल गळगटे यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकाराने खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
उडीदाची रक्कम चोरट्याने लांबवली; हतबल शेतकर्याने घेतला गळफास
