गेवराई, माजलगाव, परळी, दि. 26 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवार दि. 27 रोजी दुपारी जयभवानी सभागृह, गढी येथे गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहेत. यावेळी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. संदिप क्षिरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, विजयसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेेचा तिसरा टप्पा सुरु असुन औरंगाबाद व जालना जिल्ह्यातुन या यात्रेचे गेवराई येथे बीड जिल्ह्यात आगमण होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरु असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. सोमवार दि. 27 रोजी दुपारी 2 वाजता जयभवानी सभागृह, शिवाजीनगर (गढी) येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, बुथ कमिटीचे सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे. या प्रसंगी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. संदिप क्षिरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, डॉक्टरर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवादच्या निमित्ताने गेवराई विधानसभा मतदार संघातील पक्ष संघटनेचा आढावा घेवुन पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ कमिटीच्या अध्यक्षांशी सुसंवाद साधणार आहेत. या प्रसंगी गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व बुथ कमिटीचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे. कार्यक्रमात कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. गेवराई नंतर ते माजलगाव मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. तर सायंकाळी 6.00 वा. ते परळीत पोहचणार आहेत. ना. जयंत पाटील हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील पक्ष संघटनेचा शहरातील हालगे गार्डन येथे आढावा घेणार असून, या बैठकीस ना. धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री ना. राजेशभैय्या टोपे, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड, रा.कॉ. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कु. सक्षना सलगर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, रा.कॉ. चे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांसह बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ना. जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच परळी दौर्यावर येत असून, परळी वैद्यनाथ नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे! परळी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ना. पाटील व सहकार्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी 6 वाजल्यापासून ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हालगे गार्डन येथे पक्ष संघटनेच्या विविध आघाड्यांची आढावा बैठक होणार असून, या बैठकीसाठी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी सर्वांनी कोविड विषयक नियमांची खबरदारी घेत बैठक स्थळी उपस्थित राहावे असे आवाहन परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
—