बीड:- चकलांबा पोलिस ठाण्याचे एपीआय भास्कर नवले व त्यांच्या टीमने दोन दिवसात गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या टिप्परसह जेसीबीवर कारवाई करत १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई तालुक्यातील मौजे बोरगाव आणि सुरळेगाव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रक क्रमांक एम. एच.१२ एचडी १९४९ आणि टिप्पर क्र. एम .एच ०४ डिके ७१४९ यासह एक जेसीबी आणि वाळू असा १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरील कारवाई सपोनि भास्कर नवले,पोना येळे, रुईकर व सहकाऱ्यांनी केली.