Site icon लोकाशा-बंब न्यूज

चोरीच्या आरोपातून पारधीवस्तीवर हल्ला, दोन वर्षाचा मुलगा ठार ; दहा जण जखमी, पारनेर येथे घडली घटना


पाटोदा / बीड, : – चोरीच्या आरोपातून पारधीवस्तीवर गावातील काही लोकांनी हल्ला केला . या हल्ल्यामध्ये दोन वर्षाचा मुलगा ठार झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले . ही घटना पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे मध्यरात्रीच्या दरम्यान घडली . जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले . या घटने प्रकरणी पारनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

पारनेर येथे पारधी समाजाची वस्ती आहे . येथील लोकांवर गावातील काही लोकांनी चोरीचा आरोप करत मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांच्यावर हल्ला चढवला . यामध्ये मानु अरूण काळे हा दोन वर्षाचा मुलगा ठार झाला आहे . तर शबाना अरूण काळे , विधी भोसले , अभिमान काळे , देवराबाई काळे , वनिता भोसले , करीना चव्हाण , तारामती काळे , सोजरबाई भोसले यांच्यासह अन्य आठ ते दहा जण जखमी झाले . या जखमींना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले . या घटनेप्रकरणी पारनेर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावात बंदोबस्त वाढवण्यात आला . बीड येथे डिवायएसपी यांनी भेट देवून जखमींची विचारपूस केली . या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .

Exit mobile version