Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारुर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या

धारूर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याने रात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले . खोलेश्वर बाबूराव निर्मळ असे मृताचे नाव आहे . घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत . धारुर शहरातील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे . सदरील चालक रुग्णालय परिसरात असलेल्या कर्मचारी निवासस्थानी राहत होता . सध्या घरी एकटाच असून रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली . खोलेश्वर बाबूराव निर्मळ असे मृताचे नाव आहे . ती पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत . आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही . मयत रुग्णवाहिका चालक हा गेल्या सहा वर्षांपासुन कंत्राटी पध्दतीवर काम करत होता .

Exit mobile version