Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘‘नवरदेव मंडपात अन नवरी फरार’’;आरोग्य विभागाची परिक्षा रद्द झाल्यानंतर सोशल मिडीयावर विद्यार्थ्यांकडून अगळ्या वेगळ्या प्रतिक्रीयाचा पाऊस

बीड ः- आरोग्य विभागाच्या भरतीत सरकार पुर्णपणे नापास झाले असून भोंगळ कारभार अन सावळा गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांना झोपेत धोंडा घात 90 टक्के विद्यार्थी परिक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहचल्यानंतर परिक्षा रद्द करण्यात असल्याचे सांगितले. यानंतर विद्यार्थींनी संताप व्यक्त करत फेजबुक, व्हॉटसअ‍ॅप अस अन्य सोशल मिडीयावर अगळ्या वेगळ्या प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत. यात एक म्हणजे ‘नवरदेव मंडपात अन नवरी फारर’, ‘आरोग्य मंत्री टोपेंनी विद्यार्थ्यांना माकड टोपी घातली’, ‘आयुष्याचे वाटोळे होण्यासाठी प्रेमच करावे लागते असे काही नाही आरोग्य भरतीचा फॉर्म भरला तरी चालेल’ ‘आरोग्य भरतीचा लग्न सतरा विघ्न’ यासह काही विद्यार्थ्यांनी प्रवास भत्ता तसेच परिक्षा चलन भरणा केलेले मंत्री टोपे यांनी परत करावे अशी कॉमेट्चा सोशल मिडीयावर पाऊस पडत होता. पाऊस पडत होता.

Exit mobile version