बीड, 23 सप्टेंबर रोजी राज्य सरकाने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यावर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबईच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे.कोविडच्या गंभीर परिस्तिथीत त्यांनी बीड जिल्ह्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले होते, मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती, त्यानुसार 23 सप्टेंबर रोजी त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबईच्या आयुक्त पदी नियुक्ती दिली आहे.