Site icon लोकाशा-बंब न्यूज

महिला संबंधी गुन्ह्यांचा निपटारा जलद गतीने करा, पोलिस अधीक्षकांचे आदेश, पींक मोबाईल पथक प्रमुखांना एसपींच्या हस्ते साहित्य वितरीत


बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : महिला संबंधीच्या गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करून निपटारा करावा, तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा, असे गुन्हे करणार्‍या आरोपीस कडक शिक्षा होईल अशा रीतीने तपास करून कमीतकमी वेळेत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी पिंक मोबाईल पथक प्रमुखांना केल्या.
पिंक मोबाईलसाठी महिला संबंधीच्या गुन्ह्याचा तपास जलद गतीने व पारदर्शक व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक मोबाईल पथक कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या पथक प्रमुखांची गुरुवारी (दि.23) बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या हस्ते पथक प्रमुखांना साहित्य वितरित करण्यात आले. पीडितेला न्याय अन् गुन्हेगारास कडक शिक्षा होईल असा तातडीने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. बीड विभागाच्या पीएसआय मिना तुपे, आष्टी विभागाच्या पीएसआय राणी सानप, माजलगावचे एपीआय राठोड, गेवराई विभागाच्या पीएसआय अर्चणा भोसले, केज विभाग पीएसआय शिमाली कोळी यांची उपस्थिती होती.

Exit mobile version