Site icon लोकाशा-बंब न्यूज

युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना कोर्टाचा दणका, बी समरी रिपोर्ट रद्द, बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे न्यायालयाचे आदेश



औरंगाबाद, दि. 23 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांना कोर्टाने दणका दिला आहे. बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयाने रद्द केला असून बलात्कार प्रकरणी पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे आदेश देताना न्यायालयाने पोलिसांवरही ताशेरे ओढले आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एक बलात्काराराच गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बलात्काप्रकरणी शेख अडचणीत आलेले आहेत. सध्या या प्रकरणआवर औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी आज न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले. न्यायालयाने मेहबुब शेख यांच्याशी संबंधित असलेल्या बलात्कार प्रकरणातील बी समरी रिपोर्ट रद्द केला आहे. तसेच या बलात्कार प्रकरणाचा पुन्हा एकदा तपास कारा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बलात्कार प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोबतच तपासावरुन पोलिसांवरदेखील ताशेरे ओढले आहेत. या बलात्कार प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करावी लागणार असल्यामुळे आता मेहबुब शेख यांच्या अडचणीत भर पडली आहे. तर दुसरीकडे मेहबुब शेख यांनी या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. हवं तर माझी नार्को टेस्ट करा, असं व्यक्तव्य यापूर्वी शेख यांनी केलेलं आहे. औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणार्‍या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेहबुब शेख हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर कासार इथले रहिवासी,
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर परिचय, दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे. ज्या खुलशात या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं त्यांनी यापूर्वीच  स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version