नेकनुर, दि. 23 (लोकाशा न्यूज) : कर्तव्यावर जाण्यासाठी उशिरा झाल्याने नेकनुर पोलिस ठाण्याचे लेटर घेण्यासाठी जाणार्या फौजीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या इरटीका गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 23) रोजी 6.45 वाजता. मांजरसुंबा- नेकनुर रस्त्यावरील रविंद्र धाब्यासमोर घडली.
उमेश अभिमान सिरसाट (वय37 वर्षे), विष्णु शंकर काटे (दोघे रा. खंडाळा) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. उमेश अभिमान सिरसाट हे फौजी होते. सध्या ते बेळगाव(कर्नाटक) येथे कार्यरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ते सुट्टी घेवून गावी आले होते. मात्र सुट्टी संपूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. त्यामुळे त्यांना नेकनुर पोलिस ठाण्यातून एक लेटर घेणे गरजचे असल्याने ते घेण्यासाठी गुरूवारी सायंकाळी त्यांच्या मित्रासह दुचाकीवर जात असतांना मांजरसुबा- नेकनुर रसत्यावरील रविंद्र धाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला (क्र. एम. एच. 14-बी.ई-9542) ला पाठीमागुन येणार्या इरटीका क्र. (एम.एच.13-सी.एस.8069) ने जोराची धडक़ दिली. झालेल्या भिषण अपघातात फौजीसह त्यांचा मित्र जागीच ठार झाला. घटनेची माहिती नेकनुर पोलिसांना मिळताच घटनास्थळी ठाणेप्रमुख मुस्तफा शेख, राठोड, सोनवणे, पवार, राऊत, अनवणे, मजहर भाई यांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनुरच्या रुग्णालया पाठवण्यात आले.