Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कुसूम सौर योजनेपासून वंचित, आ . मुंदडांनी आवाज उठवताच कार्यवाहीला झाली सुरुवात


अंबाजोगाई : शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेपासून बीड जिल्ह्यातील एकूण ११५ ९ गावांपैकी ७१० वंचित असून केवळ ४४ ९ गावातील लाभार्थ्यांनाच सौर पंपाचे वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे . याबाबत केज विधानसभा मतदार संघाच्या आ . नमिता मुंदडा यांनी आवाज उठवताच महाउर्जाच्या महाव्यवस्थापकांनी बीड जिल्ह्यातील सुधारित सुरक्षित पाणलोटातील गावांची यादी पाठविण्याची विनंती भुजल सर्वेक्षणच्या संचालकांकडे केली आहे . निसर्गाचा लहरीपणा , वीजेची कमतरता शिवाय सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सहज शक्य होत नाही . परिणामी उत्पादनात घट होते . शेतकऱ्यांवरील हेच संकट दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने तीन वर्षापूर्वी प्रधानमंत्री कुसुम योजना आणली . या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येतात . बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे . बीड जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे . बीड जिल्ह्यात सिझनमध्ये शेती पंपास पाच ते सहा तासच विद्युत पुरवठा केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांकडून सौर पंपाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे . नैसर्गिक स्त्रोताचा वापर म्हणजे सौर पंप ज्यास मेंटेनन्स नाही . शेतकऱ्यास वीज बिल नाही व दिवसभर शेती पंप सुरु राहून त्यांचे भिजण व्यवस्थित होते . परंतु , कुसुम योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अतिषोशित पाणलोटातील गावांमध्ये नवीन सौर कृषीपंप मंजूर होत नसल्याने बीड जिल्हयातील एकूण १,१५ ९ गावांपैकी केवळ ४४ ९ गावांमधील लाभार्थ्यांना नवीन सौर कृषी पंप मंजूर होत आहेत . त्यामुळे केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी योजनेपासून वंचित गावांसंदर्भात सन २०१ ९ -२० चे भुजल मुल्यांकनाचा उल्लेख करून बीड जिल्हयात शोषित व अतिशोषित पाणलोट क्षेत्र नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते . तसेच , केज मतदार संघासहीत बीड जिल्ह्यातील सुरक्षित व अंशतः शोषित सर्व गावांचा समावेश प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेत करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती . याच मागणीवर पुढील कार्यवाही करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उर्जा अभिकरणाच्या ( महाउर्जा ) व्यवस्थापकांनी बीड जिल्ह्यातील सुधारित सुरक्षित पाणलोटातील गावांची यादी पाठविण्याची विनंती भुजल सर्वेक्षणच्या संचालकांकडे केली आहे . त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो वंचित गावातील शेतकऱ्यांना कुसुम योजनेचा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

Exit mobile version