Site icon लोकाशा-बंब न्यूज

बिल्डर शहेबाज खान खून प्रकरणी तिघांना जन्मठेप, बीड न्यायालयाचा निकाल, चौघांची निर्दोष मुक्तता


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : शहरातील कारंजा परिसरात सन 2017 मध्ये झालेल्या शहेबाज खान (बिल्डर) यांच्या झालेल्या खून प्रकरणात तिघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणातील अन्य चौघांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
बीड शहरातील कारंजा परिसरात दि. 17 मे 2017 रोजी शहेबाज खान दलमीर खान उर्फ बिल्डर यांचा खून झाला होता. या प्रकरणात सात जणांविरूध्द बीड शहर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास तात्कालीन पो.नि.सय्यद सुलेमान यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. याप्रकरणात बीड येथील दुसरे जिल्हा सत्र न्यायालयात  मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये तिघांना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने अरबाज खान फेरोज खान उर्फ कालू, समद खान युसूफ खान आणि फेरोज खान युसूफ खान उर्फ राजू या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर जुबेर खान समद खान, सुमेर खान, समद खान, अफरोज खान फेरोज खान, वाजेद खान समद खान या चौघांची निर्दोष मुक्तता झाली. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड अजय राख यांनी काम पाहिले.  

Exit mobile version