बीड, पोलीस अधीक्षक , बीड या घटकाच्या आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती -2019 परीक्षे बाबत उमेदवारांना सुचना , पोलीस अधीक्षक , बीड यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या चालक पोलीस शिपाई ( 36 ) पदांची भरती करणेसाठी दिनांक 30/11/2019 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती . सदर परीक्षा ही दिनांक 22-09-2021 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे . बीड घटकात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ( Admit Card ) हे https://aurangabadrangebharti.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे . उमेदवारांनी नमुद संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे . उमेदवारांनी परिक्षेला येतांना प्रवेशपत्र ( Admit Card ) सोबत घेवून येणे अनिवार्य आहे . तसेच उमेदवारांनी सुचनांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे
उमेदवारांना परिक्षेसंबधी सुचना
- परीक्षा ही दि.22-09-2021 रोजी 11:00 वा . ते 12:30 वा . पर्यंत घेण्यात येणार आहे . 2. परीक्षा केंद्रावर उमेदवारांना 09:00 वा . ते 10:30 वा.पर्यंत प्रवेश दिला जाईल . 10:30 वा . नंतर कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही . 3. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे . 4. उमेदवारांची तपासणी झडती ( Frisking ) , थर्मो गनच्या सहाय्याने उमेदवारांच्या शारिरीक तापमानाची तपासणी प्रवेशद्वारावर करण्यात येईल , उमेदवारांनी मुखपट ( मास्क ) सोबत घेवून येणे . 5. ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत : चे आधारकार्ड ( ई – आधारकार्डला मान्यता नाही ) , निवडणूक आयोगाचे ओळखपत्र , पासपोर्ट , पॅनकार्ड , ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मुळ ओळखपत्राची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे . अन्यथा प्रवेश नाकारण्यात येईल . 6. परीक्षा केंद्रामध्ये फक्त संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मुळ स्वरूपातील प्रवेशपत्र , काळा / निळा बॉल पॉईंट पेन , मुळ वैध ओळखपत्र , मुखपट ( मास्क ) एवढेच साहित्य घेवून जाण्यास परवानगी आहे . परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य सोबत बाळगल्यास ते सुचनांचे उल्लंघन समजून कारवाई करण्यात येईल 7. सोबत आणलेले साहित्य परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठेवल्यास व ते गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी या कार्यालयाची राहणार नाही . 8. परीक्षा सुरू झाल्यानंतर ती संपेपर्यंत व सर्व उत्तर पत्रिका ( OMR Sheet ) जमा होईपर्यंत कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्राच्या बाहेर जाता येणार नाही . 9. कोव्हिड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व सुचनांचे / आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे . 10. जे उमेदवार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांची शारिरीक पात्रता तपासण्यापुर्वी सर्व मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल .