Site icon लोकाशा-बंब न्यूज

साहेबांच्या प्रेरणेतूनच सोळंके कुटुंब जनतेच्या सेवेत,सुंदराराव सोळंके यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न

माजलगाव प्रतिनिधी
माजी उपमुख्यमंत्री सुंदररावजी सोळंके यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, सहकार क्षेत्रातील केलेल्या कार्याच्या प्रेरणेतूनच सोळंके कुटुंब जनतेच्या सेवेत आहे. यापुढे साहेबांच्या संस्काराची शिदोरी घेऊन समाज सेवेचे काम करत राहणार असून शेतकरी,गोर गरीब,तरुणांसाठी व विविध विकास कामासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन आ प्रकाशराव सोळंके यांनी केले.
सुंदराराव सोळंके महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी निमित्त माजी उपमुख्यमंत्री सुंदराराव सोळंके यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘आम्ही पाहिलेले साहेब’ यविषयी दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाचे अध्यक्ष आ. प्रकाशराव सोळंके होते.यावेळी चेअरमन धैर्यशील सोळंके,जि.प. सदस्या मंगलाताई प्रकाशराव सोळंके,सौ पल्लवीताई सोळंके यांच्यासह माधवराव निर्मळ, दयानंद स्वामी, के.का. सदस्य विजयकाका सोळंके, ऍड भानुदासराव डक, सत्यप्रकाश रुद्रवार, प्रा निळकंठ साबळे, अण्णाभाऊ वगरे, उद्धवराव सोळंके, बालासाहेब शिंदे,शिवाजी सुतार,रविराज सोळंके,सुरेंद्र रेदासनी, प्राचार्य डॉ. जी.के. सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना आ. प्रकाशराव सोळंके म्हणाले की, सुंदरराव सोळंके साहेबांना राजकीय कारकिर्दीत कोणताही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही.विधानसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्याचा इतिहास त्यांनी रचला.त्यांच्या संस्काराप्रमाणे व प्रेरणेने जनतेची सेवा करणार असल्याचे आ.सोळंके यांनी सांगितले.
यावेळी सु.सो.सह.साखर कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके म्हणाले की सुंदराराव सोळंके साहेबांनी कायम नैतिकता जपली. गोर गरिबांच्या कामाला प्राधान्य दिले.मराठवाड्यात विविध विकासाचे कामे करून धरणांची निर्मिती केली. आम्ही त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा चालवीत आहोत.तर जि प सदस्या मंगलाताई सोळंके यांनी कौटुंबिक अनुभव सांगितले.यावेळी दयानंद स्वामी यांनी सुंदराराव सोळंके यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रस्ताविक पल्लवीताई सोळंके यांनी केले.सूत्रसंचलन प्रा. संगीता शेजुळ यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ.नंदकिशोर मुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. एम. ए. कव्हळे, उपप्राचार्य प्रकाश गवते, उपप्राचार्य पवनकुमार शिंदे, प्रा.डॉ. भाऊसाहेब राठोड,प्रा गणेश सोळंके, प्रशांत चव्हाण, प्रा. बालाजी बोडके, प्रा. प्रदीप सोळंके यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version