Site icon लोकाशा-बंब न्यूज

गेवराई तालुक्यातील ५३ ग्रामसेवकासह २संरपंचावर रोहयो भष्टाचार प्रकरणी कारवाईची टागंती तलवार

कोळगांव दि.१९ :- रोजगार हमी योजनात झालेल्या भष्टाचार प्रकारणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ५३ ग्रामसेवका सह दोन संरपंच वर कारवाई टांगती तलवारीची नोटीस जारी झाल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. तर मादळमोही, उमापूर, चकलांबा, गढी आदी जिल्हा गटातील मोठ मोठाल्या ग्रामपंचायती समावेश आहे. रोहयोच्या कामात अन्यमिता सह काम न करता बील उचलणे असे प्रकार घडले आहेत, सात ग्रामसेवकासह दोन संरपंचावर काही रोजगारसेवकावर ही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी डाँ सचिन सानप यांनी दिले आहे. बीड जिल्हात सन २०११ ते २०१८-१९ या कालावधी झालेल्या रोजगार हमी योजनेत मोठी भष्टाचार झाल्याने जिल्हातील ५४० ग्रामसेवकाचा कारवाईत समावेश आहे. हे संपुर्ण प्रकरण माहीती अधिकार व हायकोर्टाने जिल्हा प्रशासनाला फटकरल्या पुढे आले आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची बदली देखिल या प्रकरणामुळे झाल्याने नविन जिल्हाधिकारी यांनी या प्रकरण लक्ष घातल्याने ही कारवाई होत आहे. रोहयो प्रकरणी जिल्हाभरात करोडाचा अपहार झाल्याने ही कारवाई होत आहे.
गेवराई तालुक्यातील १३७ ग्रामपंचायती आहेत. या १३७ ग्रामपंचायत मध्ये ७७ ग्रामसेवक व ११ विस्तार अधिकारी यांची देखरेख आसतानाही रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता, बोगस बीले उचलून परस्पर हाडप झाल्याने ७७ ग्रामसेवका पैकी ५३ ग्रामसेवकाना या प्रकरणी नोटिसा बजवल्याने तालुक्यात खळबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आपल्यावर कारवाई होती की काय अशा धसका ग्रामसेवकाने घेतला आहे, या भष्टाचार प्रकरण दोन संरपंचाच्या अंगलट येणार आहे. सात ग्रामसेवकासह दोन संरपंचावर कडक कारवाई होण्याची शक्याता आहे. या नोटिसाचे योग्य उत्तर न कालावधी न मिळाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या जिल्हास्तरा वरुन केल्या जाण्याची शक्याता आहे.
त्यासाठी प्रशासन पातळीवर वेगात हालचाली सुरु झाल्या असुन नवीन जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा बारीक लक्ष ठेवुन प्रत्येक घडामोड कागदावर घेवुन हायकोर्टात माहीती देणार आहेत, त्यामुळे जिल्हातील रोहयोच्या भष्टाचाराची चर्चा कट्याकट्या जोरात रंगु लागली आहे.

दोनच दिवसात भष्टाचारी ग्रामसेवकाची नांवे समोर येणार..
गेवराई तालुक्यातील रोजगार हामी योजनेत केल्येल्या भष्टाचारी ग्रामसेवक चे नांवे समोर येणार आहेत. यामध्ये काही गावप्रमुख संरपंच आसणार आहेत. रोजगारसेवकांनाही या भष्टाचाराचा जबा देवा लागणार आहे. या भष्टाचारी प्रकरणी अजुन किती मासे गळा लागतील,अशी चर्चा होत असुन अनेकावर कारवाईची टांगती तलवार असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version