गेवराई दि.१९ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपा सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे गेवराई तालुका राष्ट्रवादीमय झाला आहे.
दिनांक१७ सप्टेंबर रोजी खेर्डांवाडी येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते दत्ता चौरे, सखाराम चौरे, पवन चौरे, बबन यमगर, अनिरुद्र साबळे, नवनाथ कऱ्हे, राम कादे, दादा बाबरे आदींनी शिवसेना नेतृत्वाला कंटाळून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि. प. चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी बाळासाहेब साबळे, राजेश वाघमोडे, बळीराम भिसे यांच्यासह राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गोळेगाव येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते भागवत काळे, तुकाराम धांडे, गणेश डोरले, विशाल काळे, विश्वास घाटुळ, ज्ञानेश्वर काळे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब कोल्हापूरे, दिलीप वाघ, सोमनाथ काळे, विशाल कारके, एकनाथ इनकर आदींनी भाजपाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अमरसिंहपंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. श्री. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी संपत महाराज काळे,भाऊसाहेब महाराज काळे, शिवाजी काळे, सुदाम चव्हाण, रोहिदास चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.