Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यात नवजात बालकांची आधार नोंदणी योजना तात्काळ कार्यान्वित करा, आ. नमिता मुंदडांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्यात नवजात बालकांची आधार नोंदणी योजना तात्काळ कार्यान्वित करा, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाद्वारे 12 अंकी अंकात क्रमांक हा आधार क्रमांक म्हणून दिला जातो. सदर क्रमांक देशात कोठेही ओळखीचा पुरावा म्हणुन सादर केला जातो. 5 वर्षाखालील बालकांच्या आधार नोंदणीमध्ये बायोमेट्रिक माहिती उदा , बोटाचे ठसे आणि डोळ्यातील बाहुलीची प्रतिमा यांची नोंद घेतली जात नाही. त्याऐवजी त्यांचे आधार क्रमांक हे त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाते या मध्ये नाव, जन्म दिनांक आणि लिंग नोंदणी करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय क्र. 2016 / प्र.क्र .625 दि . 23 ऑगस्ट 2016 रोजी घेतला आहे. यात राज्यातील शासकीय खाजगी आरोग्य संस्थेमध्ये जन्म झालेल्या बालकांची त्यांच्या प्रमाणित यंत्रणा चालकामार्फत (ऑपरेटर मार्फत आधार प्रमाणीकरणा मध्ये नोंद घेण्यात यावी, नवजात बालकांचे नाव निश्चित करण्यात आलेले  नसले तरी सदर बालकांची आधार नोंदणी विना नावे करावी, अशा वेळी बालकांचे नाव हे मुल म्हणून संबोधले जाईल, त्यानुसार आईचे नाव नोंदविल्यानंतर सदर बालक हे त्याच्या पालकाचे कितवे अपत्य आहे. हे विचारात घेऊन त्या क्रमांकाने मुल आधार यंत्राणे मध्ये करावी असे शासनाचे आदेश आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वमी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व जिल्हा रुग्णालय, बीड, सर्व उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व स्त्री रुग्णालय, कुटीर रुग्णालयामध्ये  अद्याप सदर योजना सुरु करण्यात आली नाही, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड यांनी या बाबत ऑनलाईन परीक्षा देण्याबाबत पत्र काढले आहे  व जवळपास जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील प्रत्येकी दोन कर्मचारी सदर परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांना या योजनेसाठी टॅब ही देण्यात आलेले आहेत. परंतु जिल्ह्यातील जिल्ह्यात कुठल्याच रूग्णालयात सदर योजना अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही, तरी  बीड जिल्ह्यासह माझ्या केज मतदार संघातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, स्त्री रुग्णालय, नेकनूर, ग्रामीण रुग्णालय, धानोरा (खु), ता अंबाजोगाई, उपजिल्हा रुग्णालय, केज, ग्रामीण रुग्णालय, नांदूरघाट येथे ऑनलईन परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या कर्मचार्‍यांना त्वरित नेमणुका देऊन लहान मुलांची आधार नोंदणी योजना कार्यान्वित करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version