बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर . राजा यांच्या पथकाला मिळाली होती . त्यावरून १५ सप्टेंबर रोजी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला . एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले . यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना त आले . गुटख्याचा अंदाजे 75 लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला . गुटखा , दोन वाहने , दोन आरोपी असा सारा लवाजमा घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली . या कारवाईत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.