Site icon लोकाशा-बंब न्यूज

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका ; तुमच्या व्यथा आणि मागण्या शासन दरबारी मांडणार,खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी,शिरूरच्या शेतकऱ्यांना केले आश्वस्त,सरसकट मदत करण्याची मागणी

आष्टी/शिरूर । दि. १४ ।
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अस्वस्थ करणारे आहे.पिकांचे नुकसान,घरांची झालेली पडझड यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना सरसकट मदत होणे अपेक्षीत आहे.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये,त्यांच्या व्यथा आणि मागण्या आपण शासन दरबारी मांडणार आहोत अशा शब्दात खा.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

आष्टी तालुक्यातील सावरगाव,गंगादेवी,देवी निमगाव तर शिरूर तालुक्यातील पिंपळनेर,सिंदफना,गोमळवाडा आदी गावांना खा.प्रितमताई मुंडे यांनी भेटी दिल्या.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी,अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत,पिके उद्धवस्त झाले आहेत.कोणतेही निकष न लावता सरसकट मदत हाच शेतकऱ्यांना आधार देण्याचा मार्ग आहे,प्रशासनाने या दृष्टीने प्रयत्न करावेत,आम्हीही आमच्या पातळीवर सरसकट मदतीसाठी प्रयत्नशील आहोत अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

•••••

Exit mobile version