Site icon लोकाशा-बंब न्यूज

कायद्याच्या रक्षक पतीच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन पत्नीची माहेरी आत्महत्या,लक्ष्मीच्यासणा दिवशी महिलेची आत्महत्या परिसरांमध्ये हळहळ

नांदुर घाट

केज तालुक्यातील दरडवाडी येथे रविवारी दुपारच्या दरम्यान
ज्योती गोविंद जाधवर राहणार उकडगाव .ता. बार्शी .जिल्हा सोलापूर माहेरचे गाव दरडवाडी तालुका केज जिल्हा बीड. या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली . शुक्रवार रात्री तीनच्या सुमारास ज्योती जाधवर या महिलेच्या पतीने दरडवाडी येथे मारहाण करून रात्री तीनच्या सुमारास माहेरी सोडून गोविंद जाधवर हा गावी वापस गेला त्यानंतर मुलगी आपल्या वडिलांच्या घरी आली त्यानंतर मुलीच्या सांगण्याप्रमाणे लग्न झाल्यापासून 3 वर्षा मध्ये पतीचा सासूचा सासऱ्याचा व दीराचा सतत जाच असे रात्रीच्या तीन वाजता मुलीच्या पतीने मुलीला माहेरी सोडले मुलीला सतत मारत असे घरातील सासू सासरे दीर देखील सतत जाच करत असत असे बोलताना मुलीच्या भावाने सांगितले त्यानंतर मुलीने घरातील वडील भाऊ आई व इतर सदस्य शेतात गेल्याचे औचित्य साधून घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .या महिलेच्या पोटामध्ये सात महिन्याचे बाळ देखील होते .असे बोलताना भावाने सांगितले घडलेला प्रकार हा खूपच चिंताजनक आहे ज्योतीचा पती हा उस्मानाबाद पोलिस दलामध्ये कार्यरत असून कायद्यामध्ये काम करणाऱ्या रक्षकाने पत्नीला जाच केला. त्यामुळे आत्महत्या झाली असा आरोप परिवारातील सदस्य करत होते. सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय नांदुर घाट येथे मुलीचे प्रेत पोस्टमार्टम साठी आणले होते. गावांमधील नागरिक या घटनेमुळे संताप व्यक्त करत होते. पोस्टमार्टम झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य केज पोलीस स्टेशन येथे जाऊन रितसर फिर्याद देणार आहेत. असे परिवारातील मुलीच्या भावाने बोलताना सांगितले यावेळी घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे. जमादार जसंवत शेप. पोलीस नाईक रशीद शेख यांनी पंचनामा केला. त्यानंतर पुढील प्रक्रिया चालू होती मुलीच्या घरातील लोकांनी संबंधित प्रकरणाबद्दल पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version