बीड, दि 12 सप्टेंबर 2021 रोजी आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड तालुक्यात 30 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधी मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन , तसेच मोटर सायकल वर जाऊन प्रत्यक्ष आखो देखा हाल पाणी केली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी शर्मा यांनी कुर्ला येथील सिंदफणा नदीवरील केटीवेअर बंधारा चे ठिकाणी नदीने पात्र बदलल्यामुळे वाहून गेलेल्या शेतजमिनीची पाहणी केली तसेच भाट सांगवी राक्षसभुवन मार्गावरील भुक्कड मोड नदीवरील वाहून गेलेला पूल ची पाहणी केली
नंतर जिल्हाधिकारी यांचा दौरा म्हाळस जवळा, इट बेडकुचीवाडी रामगाव, पिंपळनेर बेलेवाडी या गावच्या शेतजमिनी पडलेली घरे वाहून गेलेले पूल इत्यादींची पाणी केली यावेळी पिंपळनेर येथील दलित वस्ती मध्ये जाऊन बाधितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली या पाहणी दौऱ्यामध्ये श्री मच्छिंद्र सुकटे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नामदेवराव टीळेकर उपविभागीय अधिकारी बीड शिरिष वमने तहसीलदार बीड सुरेंद्र डोके नायब तहसीलदार महसूल बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर श्री गंडे तालुका कृषी अधिकारी बीड श्री जाधव उप अभियंता मृद व जलसंधारण विभाग तसेच मंडळाधिकारी जाधव मंडळ अधिकारी काकडे व संबंधित गावचे तलाठी कृषी सहाय्यक हजर होते
यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे उप अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना थेट स्पोर्ट वरून भ्रमण दूरध्वनी करून वाकलेले विद्युत पोल तारा तसेच वाहून गेलेले पूल यांचे तात्काळ दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था करणे बाबत सक्त सूचना दिल्या सदर दौऱ्यादरम्यान पदाधिकारी श्री. कुंडलिक खांडे व जिल्हा परिषद सदस्य डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी महोदय यांना झालेल्या नुकसानीची माहिती अवगत करून दिली.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी काल गेवराई तालुक्यात भेट देऊन पाहणी केली होती. आज त्यांनी भाटसांगवी-राक्षसभुवन रोड वरील तुक्कड मोड नदीवरील पूल , जवळा येथील शेतीसह विविध ठिकाणी पाहणी केली .