Site icon लोकाशा-बंब न्यूज

यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने करा, जिल्ह्यातील गणेश भक्तांना पोलीस अधिक्षकांचे आवाहन


बीड, आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2021 हा कोरोना ( कोव्हिड -19 ) विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्याने बीड पोलीसांकडून नागरीकांना आवाहन करण्यात येते की , कोव्हिड -19 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून या वर्षांचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा . त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे . 1. शासन आदेशाप्रमाणे गणेश मुर्तीचे मुख दर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असून दर्शन केवळ ऑनलाईन माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे . 2. मा.न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश व स्थानिक प्रशासनाचे मंडपबाबत धोरण याचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत . 3. घरगुती व सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी . व श्री गणेशाची मुर्ती ही सार्वजनिक मंडळासाठी 04 फुट व घरगुती श्रीगणेश मुर्ती ही 02 फुट मर्यादितेत असावी , 4. कोव्हिड संसर्गाच्या परिस्थिती मध्ये शक्यतो पारंपारिक गणेश मुर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि.मुर्तीचे पुजन करावे , 5. मुर्ती शाडूची पर्यावरण पुरक असावी , असल्यास त्या मुर्तीचे विर्सजन घरच्या घरी करावेत . 6. श्री गणेश मंडळाच्या मंडप व डेकोरेशन चा सार्वजनिक वाहतुकीस व पादचारी याना अडथळा होणार नाही याची गणेश मंडळांनी दक्षता घ्यावी.तसेच मंडळाचे संरक्षण / सुरक्षा देखरेख यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मंडळाची राहील . 7. श्री.गणेश भक्तांनी / मंडळांनी पर्यावरण प्रदूषण ( ध्वनी , हवा , पाणी ) याबाबतच्या नियमांचे व तरतुदीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे . 8. श्रीगणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढण्यास शासनाने प्रतिबंध केला आहे.त्यामुळे गाव नगर । कॉलनी / यातील गणेश भक्तांनी / मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.ज्या कोव्हिड -19 ( कोरोना ) या संसर्गाचा फैलाव व प्रसार रोखण्यास प्रतिबंध होण्यास मदत होईल असे आवाहन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी केले आहे.

Exit mobile version