Site icon लोकाशा-बंब न्यूज

अभिलेखे अद्यावत न ठेवणे अंगलट आले, सीईओंनी आरोग्य विभागातील ‘त्या’ नऊ जणांवर ठेवला ठपका


बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : अभिलेखे अद्यावत न ठेवणे येथील आरोग्य विभागातील नऊ कर्मचार्‍यांच्या अंगलट आले आहे. सीईओ अजित पवार यांनी या प्रकरणात सदर कर्मचार्‍यांवर ठपका ठेवला आहे.
   तात्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी तात्कालिन सीईओ अजित कुंभार यांच्याकडे एक तक्रार केली होती, पुढे कुंभार यांनी दिलेल्या आदेशानुसार आस्थापनाचे डेप्टी सीईओ प्रमोद काळे यांनी येथील आरोग्य विभागात अचाणक जाणून झाडाझडती घेतली होती,
यावेळी या कार्यालयात अभिलेखे अस्तावस्ता असल्याचे काळे यांच्या निदर्शनास आले होते, याप्रकरणीच त्यांनी 16 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, यापैकी सात जणांचे खुलासे मान्य करण्यात आले आहेत. तर नऊ जणांवर सीईओ अजित पवार यांनी ठपका ठेवला आहे. या नऊ जणांनी कार्यालयातील अभिलेखे अद्यावत ठेवले नसल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version