बीड : अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे सोमवार (दि.6) दुपारपासून भूगर्भातुन गूढ आवाज येत आहेत. या आवाजांनी गाव व परिसर हादरत असून सोमवारी मध्यरात्री (1: 30 वाजता) एवढा मोठा आवाज झाला की सारे गाव हादरले. भूकंपाच्या भीतीने गावकऱ्यांनी सारी रात्र जागवून काढली. गूढ आवाजाबाबत सरपंच बाळासाहेब केंद्रे यांनी तलाठी व तहसील कार्यालयाला कळवले. परंतु प्रशासनातील कोणीही अध्यापर्ययन्त गावात फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले. गावकरी भयभीत झाले असून प्रशासनाने गावात येऊन पाहणी करावी, गूढ आवाज कशाचे आहेत याची माहिती तज्ञांनी गावकऱ्यांनी द्यावी असे आवाहन सरपंच बाळासाहेब केंद्रे यांनी केले आहे.