Site icon लोकाशा-बंब न्यूज

अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावे समृद्धीच्या वाटेवर,सरकारी योजनेची जोड देऊन आपली शेती समृद्ध करा :- अजित पवार

अंबाजोगाई दि १०(प्रतिनिधी)

पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील १६ गावांनी स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला.
यामध्ये गावातील विहीर पाणी पातळी मोजमाप, विहीर बोरवेल गणना, हंगामनिहाय पीक सर्वे इत्यादी कामे करून आपल्या गावाला समृद्धीच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या गावांचा सन्मान सोहळा टि बी गिरवलकर तांत्रिक महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,रोपे देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, मा.दत्तात्रय गिरी(उप मुख्य कार्यकारी अधिकारी बीड)
उपविभागीय अधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी संदीप घोन्सीकर,मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे(ज्ञानप्रबोधिनी )
प्रा.बाबासाहेब ठोंबरे, मा.धनराज सोळंखी(बी.जी.एस),
मा.निशिकांत पाचेगावकर (रोटरी कल्ब) उमेद अभियान मा.भारत पवार,पानी फांऊडेशन रिझनल समनव्यक संतोष शिनगारे, विनोद ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना
अनिकेत लोहिया यांनी वॉटर कप स्पर्धेत गांवानी पानलोटाची खुप कामे केली परंतु आता या कामातुन जे पानी अडवले त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन गावे समृद्ध करावी या प्रवासात मानवलोक संस्था आपल्या सोबत आहे असे मत व्यक्त केले.
प्रसाद चिक्षे म्हणाले
गावच्या एकीने तालुक्यात गावाला वेगळी ओळख दिली पण आता महाराष्ट्रा मध्ये गावाची वेगळी ओळख होण्यासाठी गावा मध्ये समृद्ध गाव स्पर्धेतील सहा स्तंभावर कामे करावी आपले गाव समृद्धीच्या दिशेने घेऊन जावे.
शरद झाडके म्हणाले
२०१६ साली वॉटर कप च्या माध्यमातून अंबाजोगाई तालुक्याने महाराष्ट्र मध्ये आदर्श असे काम केले
महाराष्ट्राला दिशा दिली आता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून परत एकदा दिशा दर्शक काम करावे व आपले गाव व तालुका समृद्ध करूयात यासाठी आपणाला लागणाऱ्या प्रशासकीय मदतीसाठी प्रशासन सदैव तत्पर आहे.
मा.दत्तात्रय गिरी म्हणाले
वॉटर कप स्पर्धा आनंद उत्सव म्हणून साजरी केली व गावे पाणीदार केले पाण्याचा प्रश्न मिटला आता समृद्ध स्पर्धेच्या माध्यमातून आपली शेती व आपले गावे समृद्ध करूया परत एकदा आनंद उत्सव साजरा करूया
अजित पवार (मुख्य कार्यकारी अधिकारी बीड) म्हणाले
पाणी फाउंडेशन ने वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावाना वेगळी ओळख दिली गावे एकत्र येत आपल्या गावचा पानी प्रश्न मिटवला पण आता समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शेती व माती समृद्ध करूया तसेच आपल्या शेतीला अधुनिकतेची जोड देऊन शेती मध्ये बदल करुयात तसेच आपल्या शेती मध्ये पिकणाऱ्या पिकाचा एक वेगळा ब्रँन्ड तयार करून बदलत्या युगात वेगळी ओळख देऊ.यासाठी सरकारी योजनेची जोड देऊन आपली शेती समृद्ध करूयात.

—-चौकट—–

या गावांचा झाला सन्मान ऊजनी,खापरटोन,भतानवाडी,साळुंकवाडी,ममदापुर (परळी),मांडवा(पठाण), गिरवली (आपेट),सुगाव,सेलुअंबा,दैठणा,राडी तांडा,कुंबेफळ,धानोरा (खुर्द),कोळकानडी, सनगाव,वरपगाव आदी गावांचा सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमास विविध गावचे ग्रामसेवक ,तलाठी ,कृषी सहाय्यक ,सरपंच ,उपसरपंच ग्रा प सदस्य ,जलदुत अंगणवाडी सेविका ,आशा ताई ,महिला,यांच्याच्यासह गावकर्‍यांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना संतोष शिनगारे यांनी समृद्ध गाव स्पर्धेची वाटचाल व पहिल्या टप्प्यातील कोण कोणती कामे झाले या बदल आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ठोंबरे यांनी तर आभार महेश गुळभिले यांनी मानले.

Exit mobile version