Site icon लोकाशा-बंब न्यूज

नागरिकांनो, सर्तक रहा, राज्यात पुन्हा 6,7,8,9 सप्टेंबरला जोरदार कोसळणार पाउस,पंजाब डख यांचा अंदाज

बीड,
दि.3,4,5 सप्टेबर या तारखेत ☀️🌤️सुर्यदर्शन होउन पाउस कमी होइल . पण स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो माहीत असावे राज्यात पून्हा दिनांक 6.7.8.9 संप्टेबर या तारखेमध्ये मुसळधार पाउस पडणार आहे. सर्व जनतेने सर्तक रहावे व स्वःत ची व पाळीव प्राणाची काळजी घ्यावी या पावसाने राज्यातील धरण क्षेत्रात पाणी येण्यास आवक होइल . नदी काठच्या जनतेने सर्तक रहावे विजा चमकत असताना सरळ शेतातून घरा कडे जावे . झाडा खाली थांबू नये .वातावरणात अचानक बदल झाला तर मेसेज दिला जाईल -*

🟡 राज्यातील सर्व छोटी तळे धरणे कोरडे राहणार नाही सर्व धरणात पाणी येइल . इतका पाउस संप्टेबर व ऑक्टोबर महिण्यात पडणार आहे .

पूर्वविदर्भ, प . विदर्भ , मराठवाडा प महाराष्ट्र . उत्तर महाराष्ट्र हा सर्व विभागा मध्ये पाउस पडणार आहे. व तसेच काही भागात रिमझिम पाउस पडेल . माहीत असावे .

🟣 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

🟠 शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )
2/09/2021

Exit mobile version