Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारूरचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी यांच्यावर विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल,धारूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त

किल्लेधारूर : शहराचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी मागील 3 दशकापासून अधिक वर्ष वैद्यकीय सेवा देत आहेत . त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोनोग्राफी करण्यास आलेल्या महिलेचा त्यांनी विनयभंग केला , अशी तक्रार सायंकाळी 9 वाजता येथील ठाण्यात पीडितेने दिली . त्यानंतर विनयभंगासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे . डॉ.हजारी हे नगराध्यक्ष तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत .
पीडितेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे , हॉस्पिटलमध्ये आपण सोनोग्राफी करण्यासाठी गेले होते . त्यावेळी डॉ.हजारी यांनी आपल्या अंगावरील कपडे काढायला लावत लज्जास्पद वागणूक देत जातीवाचक शब्द वापरल्याची तक्रार नोंद केली . ही तक्रार नोंद झाल्यानंतर हजारी यांच्या हॉस्पिटलसमोर समर्थक आणि शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत घटनेचा निषेध व्यक्त केला .
तगडा पोलीस बंदोबस्त ; डॉक्टर असोसिएशनचे निवेदन
सदरील विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा डॉ.स्वरूपसिंह हजारी यांच्यावर दाखल झाल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद ठेवत झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला . तसेच डॉक्टर असोसिएशनने काळ्या फिती लावत तहसीलदारांना निवेदन देऊन दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे . शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी राखीव पोलीस दलाच्या तुकड्या शहरात दाखल झाल्याने शहरास आणि सार्वजनिक ठिकाणी पोलीस छावणीचे रूप आले आहे .

Exit mobile version