Site icon लोकाशा-बंब न्यूज

चऱ्हाटा पीएससीची राजेंद्र मस्केंनी केली पहाणी,सुसज्ज इमारतीतून जन आरोग्यसेवा घडावी -राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी

लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील मौजे चराठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पहाणी केली.

एखाद्या ग्रामीण रुग्णालयाला लाजवेल अशी सुसज्ज व प्रशस्त इमारत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध आहे. सुसज्ज रुग्णवाहिका, कार्यत्पर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग, औषधी आदी अत्यावश्यक सर्व सुविधा सह हे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या संकटात या आरोग्य केंद्राने प्रभावी भूमिका निभावली. जनतेला आरोग्य सेवेची मदत केली.

केंद्राअंतर्गत असणाऱ्या वरवटी, धानोरा, तळेगाव, काकडहिरा, पालवण, गवळवाडी, धुमाळवाडी, जाधववाडी आदी भागातील ग्रामीण जनतेला या आरोग्य केंद्राच्या  माध्यमातून सेवा  मिळत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश तांदळे,डॉ. बांगर, श्री जाधव यांच्यासह आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आरोग्य सेवांची माहिती घेतली. Covid-19 प्रतिबंधात्मक लस मोहि प्रभावीपणे राबवली जात असून आज पर्यंत सुमारे साडेपाच हजार नागरिकांना लस दिली गेली.आज ही लसीकरण मोहीम चालू असून वाडी वस्तीवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचण्यासाठी येथील अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणीपणे प्रयत्न करीत आहेत. Covid-19 महामारी संकट पूर्णपणे टळलेले नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यापुढेही जनतेने सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील काम केंद्राचे काम समाधानकारक असून यापुढे ही अविरतपणे चालू राहील.सुसज्ज इमारत व कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून या केंद्रातून अखंडपणे जन आरोग्य सेवा घडावी .अशी सदिच्छा व्यक्त करून राजेंद्र मस्के यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.  यावेळी शरद बडगे, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version