Site icon लोकाशा-बंब न्यूज

संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत दाखल गुन्हयातील फरार आरोपी एलसीबीने केला जेरबंद


बीड, मा.पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांनी पोलीस स्टेशन अभिलेखावर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत दाखल गुन्हयातील बरेच आरोपी अद्याप पर्यंत फरार असल्याने , आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहिम राबवून आरोपी अटक करुन पुढील कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले होते . त्यावरुन पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांनी स्था.गु.शा. येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके तयार करुन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत दाखल गुन्हयातील फरार आरोपी पकडणे बाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत , त्यावरुन दिनांक 29/08/2021 रोजी सदर शोध मोहिमे अंतर्गत स्था.गु.शा.चे अधिकारी व अंमलदार हे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्या अंतर्गत दाखल गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , पो.स्टे.शिवाजीनगर गु.र.नं. 403/2019 कलम 302 , 120 ( ब ) भा.दं.वि. सह कलम 3 मोक्का कायद्यामधील आरोपी नामे शेख सर्फराज उर्फ सरु डॉन उर्फ शेरु शेख मुसा रा.बालेपीर , बीड ता.जि.बीड हा सेलू ता.सेलू जि.परभणी येथे त्याचे नातेवाईकांस भेटण्यासाठी येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन सदर माहितीचे ठिकाणी स्था.गु.शा.चे अधिकारी व अंमलदार यांनी योग्य पध्दतीने सापळा लावून त्यास सेलू बसस्थानक येथे 17.00 वा . अथक परिश्रमानंतर त्यास ताब्यात घेवून संबंधीत पोलीस स्टेशन , शिवाजीनगर येथे हजर केले आहे . वरील आरोपीवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून वरील आरोपीचे शोधासाठी पोलीस बरेच दिवसांपासून त्याचे मागावर होते . आरोपी शेख सर्फराज उर्फ सरु डॉन उर्फ शेरु शेख मुसा रा.बालेपीर , बीड याने व त्याचे साथीदार यांनी सन -2019 मध्ये पोलीस स्टेशन , शिवाजीनगर हद्यीतील बालेपीर भागातील शिक्षक सय्यद साजेदअली यांचा खुन करुन आज पर्यंत फरार होता . त्यांच्याही मुसक्या आवळण्यात बीड पोलीसांना यश आले आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

Exit mobile version