बीड, दिनांक 28/08/2021 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे अधीकारी व कर्मचारी बीड शहरात पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीष वाघ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , रॉयल ज्युस बार अॅक्सीस बँक समोर अक्षय लाड नावाचा इसम उभा असुन तो विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्यांचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे.अशी माहिती मिळाल्याने स्थागुशा चे अधीकारी व अमलदार यांना बातमीची ठिकाणी पाठविले असता , सदर अधीकारी व अमलदार यांनी सापळा लावुन दिलेल्या बातमीमधील वर्णनाच्या इसमास ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांने त्याचे नाव गाव अक्षय व्यकटराव लाड वय 22 वर्षे रा.माळीवेस कोतवाल गल्ली बीड असे सांगितले , सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कंबरेला एक गावठी पिस्टल व मॅग्झीन मध्ये एक जिवंत राऊंड मिळुन आला त्यास हत्यार बाळगण्याचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्यांने परवाना नसल्याचे सांगितले , त्यावरुन सदर इसमा कडुन गावटी पिस्टल व राऊंड असे 50500 / -रुपयाचा मुदेमाल जप्त करुन त्यास पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे हजर करुन त्यांचे विरुध्द कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . सदरची कामगीरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधीकारी व अमलदारांनी केली आहे .