बीड )ः- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत कार्यरत असणार्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर नगर रचना व व्यवस्थापन विकास कार्यरत संवर्गातून बीडमधील प्रख्यात उद्योजक तथा काझी अॅण्ड संघानी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक समीर गुलामनबी काझी यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. समीर काझी हे बीडमधून आतापर्यंतचे पहिले सदस्य वक्फ बोर्डाच्या मंडळावर गेल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून काझी यांनी उद्योग क्षेत्रात आपले आणि जिल्ह्याचे नाव राज्य आणि देशपातळीवर नेले आहे. यापुर्वी त्यांनी बीड डिस्ट्रीस्ट बिल्डर असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ मिटडाऊनचे अध्यक्षपद भुषवले आहे. आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीमध्ये समिर काझी यांना काझी अॅण्ड संघानी ग्रुपचे अतुल संघानी यांनी मोलाची साथ दिली आहे.
राज्यामध्ये ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात आजची तरुणाई मात्र वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव कमावत आहे. उद्योग क्षेत्रात असेच समीर गुलामनबी काझी यांनी नाव कमावले आहे. गेल्या अनेक वर्षापासून उद्योग क्षेत्रात कमालीचा संघर्ष करत समीर काझी यांनी अल्पावधीतच यशाचे शिखर गाठले. सामाजिक जान आणि भान असणार्या या तरुण उद्योजकांने काझी अन्ड संघानी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन, क्रिडाईचे राज्य समन्वयक म्हणून सध्या काम करत आहे. तत्पुर्वी त्यांनी बीड डिस्ट्रीक बिल्डर असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ मिटडाऊनचे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या कार्य केेलेले आहे. बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचा मोठा अनुभव असून समीर काझी या उद्योजकास महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभाक विभागा अंतर्गत कार्यरत असणार्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्रालयाचे उपसचिव दिनेश सोनवणे यांनी अधिसुचना प्रसिध्द करुन समिर गुलामनबी काझी यांच्या नावाची घोषणा केली. वक्फ कौन्सील ऑफ इंडीयाच्या केंद्र शासन योजनेतून महाराष्ट्र वक्फ मिळकतीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे या निवडीनंतर समीर काझी यांनी सांगितले. समिर काझी यांची वक्फ बोर्डावर निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून क्रिडाईचे राष्ट्रीय चेअरमन सतिशदादा मगर, क्रिडाईचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल फुरडे, क्रिडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र जांबिदा, क्रिडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलालजी कटारीया, काझी समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अकबर अली काझी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी समिर काझी यांचे अभिनंदन केले आहे.
चौकट
वक्फ बोर्ड आपल्यादारी योजनेतून नागरीकांच्या समस्या सोडविणार-समीर काझी
वक्फ बोर्डाच्या मंडळावर नियुक्ती झाल्यानंतर समीर काझी यांनी येत्या काही काळात वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकंाचे प्रश्न कसे सुटले जातील याकडे प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे सांगुन वक्फ बोर्ड आपल्या दारी योजनेतून लोकांच्या घराघरात जावून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. माझ्यावर टाकण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे काझी यांनी सांगितले.