बीड प्रतिनिधी-
राष्ट्रसंतभगवान बाबांनी भागवत धर्माचा वारसा जपत सर्वदुर वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. समाज प्रबोधनाचा निश्चय केला. वारकरी संप्रदायात राहुन समाज परिवर्तानाचे काम केले. गावोगावी हरीनाम स्पताह सुरु करुन जनमानसात सुसंवाद निर्माण केला. भ्रमंती करुन लोकांना त्यांच्या भाषेत मार्गदर्शन केले. धर्म आणि धर्माचे महत्व जाणुन दिले. किर्तन प्रवचन व नामस्मरण भक्ती चा मंत्र गाव खेड्यातील माणसां पर्यंत पोहचवला. त्यांच्या वारकरी संप्रदायातील कार्यामुळे ग्रामीण जन मनसात धर्मचळवळीला स्फुर्तीमिळाली. बाबांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांना मुटमाती देऊन सदमार्गावर चलण्याचा उपदेश दिला. भरकटलेल्या समाजाला शिक्षनाचे महत्व समजावले. धर्माच्या विविध वचनांचा अर्थ सांगीतला. मानवतेचा कायम पुरस्कार करून भाविकजनांना सन्मार्ग दाखवला, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
आज राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या जयंती निमित्ताने बीड शहरातील भगवान बाबा चौक व संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना ॲड.सर्जेराव तांदळे म्हणालेकी संत भगवान बाबा यांच्या विचाराचे समाज परिवर्तना मध्ये मोलाचे योगदान आहे. बाबांनी तहयात भागवत धर्माची पताका कायम खांद्यावर ठेऊन वाडी वस्तीवर भागवत धर्म नेला. भागवत धर्माबरोबरच समाज परिवर्तानाचा निश्चय करून समाज परिवर्तन घडवले. गोरगरीब आज्ञानी कष्ट करी लोकांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचा कवडसा निर्मान केला. बदलत्या युगात शिक्षना शिवाय मानसाची प्रगती अशक्य आहे. याची जानीव करुन दिली. लोकांच्या मनात आत्मविश्वास आणि स्वाभिमना जागरूक करून आत्मउन्नतीचा मार्ग दाखवला. या प्रसंगी
ॲड.सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, शिवाजीराव मुंडे, शांतीनाथ डोरले, प्रमोद रामदासी, शरदजी दुगड, महेश सावंत, शाम कोटुळे, नरेश पवार, सरपंच बेलदार, उध्दव जाधव, भागवत खाकरे, डोहीफोडे अशोक, कल्याण पवार, अजय ढाकणे,राकेश बिराजदार, अनिल शेळके आदि उपस्थित होते.