Site icon लोकाशा-बंब न्यूज

संघर्षाचा सं‘दिप’, गोरगरिबांचा हक्काचा माणूस, काकूंचा सक्षम वासरदार


संघर्ष’च माणसाला आयुष्यात सगळं काही देवून जातो, संघर्षातूनच बीडसह  देशातील अनेक नेते घडले आणि त्या नेत्यांनी समाजातील वंचितांचे प्रश्‍नही पावलोपावली सोडविले, त्यामुळेच या नेत्यांचे आजही नाव लोकांच्या मना-मनात जिवंत आहे आणि पुढेही ते जिवंतच राहील, बीड मतदार संघाचे विद्यमान आ. संदीप क्षीरसागर हेही नेतृत्व मोठ्या संघर्षातून उदयास आलेले आहे. तळगाळातील लोकांचे प्रश्‍न तडीस लावल्यामुळे आख्खा बीड मतदार संघच संदिप भैय्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहिला आणि लोकांनी विजयाचा टिळा त्यांना लावून मतदार संघाची संपूर्ण जबाबदारीच त्यांच्यावर सोपवून दिली. या तरूण-तडफदार आमदारामुळे बीड मतदार संघातील एक एक आणि अत्यंत महत्वाचे विकासाचे प्रश्‍न आज सुटत आहेत. काकू-नानांचा वसा आपल्या डोळ्यासमोर ठेवून आ. संदिप क्षीरसागर हे जनतेच्या प्रश्‍नांसाठी आणि मतदार संघाच्या विकासासाठी आहोरात्रपणे काम करीत आहेत. या कामामुळेच काकू-नानांचा सक्षम वारसदार म्हणूनही आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. परिणामी आ. संदिप भैय्या हीच आमची खरी ताकत आहे, तेच आमचे खर्‍या अर्थाने प्रश्‍न सोडवू शकतात, असा विश्‍वास आज त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने व्यक्त केला जात आहे.
राजकारणात लोकांना पावलोपावली शब्द द्यावे लागतात, मात्र दिलेला शब्द तेवढ्याच हिंमतीनेही सोडवावे लागतात, अगदी त्याच प्रमाणे आ. संदिप भैय्या लोकांना शब्द देतात आणि दिलेला शब्दही अगदी काही वेळेतच पुर्ण करतात, एखाद्या वृद्धाचा मानधनाचा प्रश्न असेल किंवा एखाद्या कार्यकर्त्याची अगदी कौटुंबीक अडचण, कोणी रूग्णालयात दाखल असेल किंवा कोणाचे घरातील छोट्यात छोटे मंगल कार्य असेल, या प्रत्येक गोष्टीत एका व्यक्तीला फोन केला तर काम होईल किंवा ही व्यक्ती आपल्याकडे आलीच पाहिजे अशी भावना प्रत्येकाची असते. ती व्यक्ती म्हणजे अर्थातच आ.संदिप भैय्या क्षीरसागर! केवळ आमदार आहेत म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही भैय्या म्हणून या व्यक्तीला केवळ मतदार संघाताच नाही तर सर्वत्र जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, जनतेने आपलेसे केलेले आहे, आपल्या हृदयात स्थान दिलेले आहे. हे केवळ व्यक्ती जमवण्यापुरते नाही तर विकास कामांच्या बाबतीतही तसेच आहे. प्रश्न बीड शहरातील रस्त्याचा असेल, सिंचनाचे विषय असतील, आरोग्याचे किंवा कृषी विभागाचे. आपले प्रश्न संदिप भैय्याच सोडवू शकतात हा विश्वास येथील जनतेच्या मनात आहे आणि तो विश्वास सातत्याने जपण्याचे काम आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी  केले आहे. म्हणूनच खर्‍या अर्थाने कार्यकर्ते असतील किंवा मतदार संघाच्या विकासाची प्रक्रिया या दोन्ही गोष्टींना आ.संदिप भैय्या मोठा आधार वाटतात. बीड मतदार संघालाच नव्हे तर बीड जिल्ह्यालाच स्व.काकूंनी एक वेगळा वारसा दिला आहे. हा वारसा आहे माणसे जपण्याचा, विकास कामे पुढे नेण्याचा. हा वारसा स्व.काकूंच्या नंतर खर्‍या अर्थाने कोणी जपला असेल तर तो आ.संदिप भैय्यांनी. एकाच वेळी वेगवेगळ्या स्तराचे कार्यकर्ते जपायचे, त्यांच्या अडीअडचणीत धावून जायचे, त्यांच्या सुख दु:खाची ओळख ठेवायचे आणि अगदी व्यक्तीगत पातळीवर हे संबंध जपतांनाच त्या गावाच्या किंवा त्या भागाच्या विकासासाठी काय पाहिजे आहे हे देखिल ओळखायचे. राजकारणात अनेकदा व्यक्तीगत संबंध आणि विकास कामे या दोन्हींमध्ये निवडायची वेळ आली तर बहुतेक लोक व्यक्तिगत संबंध निवडतात. काही वेळा सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष झाले तरी व्यक्तीगत संबंध चांगले असतील तर फरक पडत नाही असा एक समज राजकारणात रूढ होवू पाहत आहे. पण आ.संदिप भैय्या क्षीरसागर त्याला अपवाद आहेत. व्यक्तीगत संबंध जपलेच पाहिजे पण त्याचवेळी जनतेच्या विकासाची कामे अडली नाही पाहिजेत. हा त्यांचा दंडक असतो. म्हणूनच एखाद्या  कार्यकर्त्याच्या व्यक्तीगत अडचणीच्यावेळी ज्या तडफेने ते धावून जातात अगदी त्याच उत्साहात ते मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी धडपडत असतात. हे आजचे नाही किंवा ते आमदार झाले आहेत म्हणून असे करतात असे ही नाही. तर व्यापाक प्रमाणावर विकास कामे राबवण्यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात. तो वसा त्यांनी स्व.काकूंकडून उचलेला आहे. जे की इतरांना ते जमलेले नाही, खेड्या पाड्यातील लोकांच्या अडचणी काय असतात? एखाद्या गावात पुल नसेल तर गावाचा संपर्क कसा तुटतो? आणि तेथिल लोकांना तालुक्याला यायला काय अडचणी असतात? हे रवि दादांकडून त्यांनी अनेकदा ऐकले आहे. बीड शहरावर ज्या ज्यावेळी पुराचे संकट आले त्या त्यावेळी संदिप भैय्यांनी कशी मदत शहरवासियांना केली हे कोणीच विसरू शकत नाही, अगदी लहानपणापासून सामान्यांची नाळ जोडत गावाचा विकास कसा करायचा असतो याचे बाळकडू त्यांना मिळाले. आणि म्हणूनच ज्या-ज्या पातळीवर त्यांना संधी मिळते त्या-त्या ठिकाणी ते आपल्या भागाचे प्रश्न मांडत असतात. शरद पवार साहेबांना भेटल्यानंतर राजकारणात स्वत:साठी काही मागण्याऐवजी माझ्या मतदार संघाचे इतके मोठे प्रश्न आहेत ते मार्गी लावा असे साकडे घालणारे आमदार कमी असतात. संदिप भैय्या क्षीरसागर त्यापैकी एक आहेत,  हे संपूर्ण बीड मतदार संघाने आपल्या उघड्या डोळ्याने पाहिले आहे. मुंबईला जायचे असेल किंवा कोणत्या मंत्र्याला भेटायचे असेल तर आपल्या भागात काय प्रश्न आहेत? वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून कोणत्या योजना येवू शकतील? कोणाला भेटल्यावर कोणता प्रश्न मार्गी लागेल? यासाठी ते सातत्याने समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाशी बोलत असतात. आणि त्यातून जी माहिती मिळते त्यानुसार पत्र तयार करण्याच्या सूचना आम्हाला देत असतात. मुंबईला निघलो की निघतांना यादीत तीन-चारच काम असतात पण मुंबईत पोहचेपर्यंत ती यादी भरपूर मोठी झालेली असते. आणि यामुळे कोरोनाच्या दोन वर्षातील काळातही बीड मतदार संघाला वेगवेगळ्या विषयात मोठा निधी मिळाला असून अनेक प्रकल्प आता मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. जसे विकास कामांचे तसे कार्यकर्त्यांच्या व्यक्तीगत सुख दु:खाचे. भैय्या कुठेही असोत त्यांना एखाद्या कार्यकत्यांचा फोन आला आणि त्याने अडचण सांगितली की मग ती सोडवण्यासाठी काय-काय करता येईल यासाठी भैय्या कायम सजग असतात. कोणाला सूचना द्यायच्या? कोणाला फोन करायचे? याचे आदेश ते देत असतात. कितीही महत्त्वाच्या कामात असो किंवा कोठे ही असलोत तरी जे कार्यकर्ते किंवा जे लोक आपल्यावर जीवापाढ प्रेम करतात त्यांची अडचण होवू नये हाच या मागचा प्रयत्न असतो. जोपर्यंत तो कार्यकर्ता स्वत: त्यांना फोन करून काम झाले आहे असे सांगत नाही तोपर्यंत भैय्या आपले लक्ष काढत नाहीत. म्हणूनच या नेत्याबद्दल प्रत्येक कार्यकर्त्याला एक आपले पणा वाटतो. हा नेता हाच आपला आधार आहे ही भावना त्यांच्या याच स्वभावातून प्रत्येकाच्या मनात रूजलेली आहे आणि सामान्य जनतेला ही काकूंचा विकासाचा, सर्व धर्म सम भावाचा, फुले, शाहु, आंबेडकरी विचारधारेचा आणि सामान्यांना सोबत घेवून पुढे जाण्याचा विचार त्यांचा हाच नातु पुढे घेवून चालू शकतो हा विश्वास जनतेत निर्माण झालेला आहे. म्हणूनच मतदार संघातील जनतेने काकूंच्या या नातवावर मोठी जबाबदारी टाकली आहे. आणि भैय्यासुद्धा पुर्ण ताकदीने विकास प्रक्रियेला, काकूंच्या विचार धारेला आणि सामान्य कार्यकर्त्याला आधार होण्याचे सक्षमपणे काम करत आहेत. वास्तविकत पाहता जनतेच्या आरोग्यासाठी त्यांनी बीडमध्ये काकू-नाना हॉस्पिटलची उभारणी केली, या हॉस्पीटलमुळे आज अनेक गोरगरिबांना मोठी मदत होत आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर तर ते सातत्याने बांधावर गेलेले आहेत, आणि यापुढेही ते जाणारच आहेत. संदिप भैय्यांच्या आक्रमक आणि कडक भुमिकेमुळेच बीड मतदार संघातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न खर्‍या अर्थाने मार्गी लागत आहेत. विशेष म्हणजे मागच्या दोन वर्षांपासून  संपूर्ण बीड जिल्हा कोरोनाच्या संकटात आहे. या संकट काळात त्यांनी गरीबांना मदतीचा हात देवून मोठा आधार दिला आहे. विशेष म्हणजे कोविड सेंटरच्या वार्डा-वार्डात जावून त्यांनी प्रत्येक रूग्णाची आस्थेवाईकपणे विचारपुस केली आणि त्यांच्या अडचणी तात्काळ दुर केल्या. बीड मतदार संघाची परिस्थिती लक्षात घेतली तर सर्वसाधारण आणि गरीब कुटुंबातील लोकांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या संकट काळात बीड मतदार संघ बर्‍याच वेळा लॉकडाऊन राहिला. या लॉकडाऊन काळात गोरगरीबांची चुल बंद पडु नये, कोणी उपाशी पोटी झोपू नये या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी हजारो कुटुंबीयांना मदतीचा हात कर्तव्य म्हणून दिला. बीड शहरासह ग्रामिण भागात आ.संदिप भैय्यांच्या वतीने वाडी, वस्ती, तांड्यावर मदत पोहचली. गरीबांच्या घरामध्ये मदत करत असतांना आ.संदिप भैय्या यांनी कधीच मोठे पणा दाखवला नाही. सामान्य माणुस हीच माझी ताकद आहे. त्यांचा सेवक या नात्याने मी मदत करेल तेवढी कमीच आहे अशी भावना बीडच्या जनतेने आ.संदिप भैय्यांची सातत्याने पाहिलेली आहे. या लोक उपयोगी कामामुळेच त्यांना राजकारणात प्रत्येक ठिकाणी यश आले आणि याही पुढे असेच यश त्यांना मिळत राहील, असा विश्‍वास आज त्यांच्या वाढदिवसानिमीत्त बीड मतदार संघातून बोलून दाखविला जात आहे.

विकास कामातही
भैय्यांची सरसी
बीड मतदार संघावर सातत्याने क्षीरसागर कुटूंबियांची पकड राहिलेली आहे. जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्याकडे अनेक वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते, तर दुसर्‍या बाजूने डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या ताब्यात संपूर्ण बीड शहर राहिले आणि सध्याही आहे, मात्र मनावा तसा विकास त्यांच्याकडून होत नसल्याची टिका सातत्याने होत आहे. लोकांची हीच ओरड लक्षात घेवून संदिप क्षीरसागरांनी आक्रमक भुमिका घेतली, विकास कसा खुंटला जातोय यावर स्पष्टपणे आवाज उठविला, त्यामुळे बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरूवात झाली, रस्त्याबरोबरच आरोग्यासह अन्य प्रश्‍न सुटले. आपल्या विरोधकांपेक्षा जास्त विकास आम्ही करून दाखवू असा विश्‍वास दिल्यानंतर संदिप भैय्यांच्या पाठीशी संपूर्ण बीड मतदार संघ खंबीरपणे उभा राहिला, आता तेच आ. संदिप भैय्या विकास कामातही आपल्या विरोधकांना सरस ठरत असल्याचे लोकांमधून सांगितले जात आहे.

अन् भैय्या बनले अनेकांच्या गळ्यातील ताईत
मागच्या अडीच वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपुर्ण राज्यात संकटात होता, बीडमध्येही पक्ष मोठ्या अडचणीत होता. अशा परिस्थितीत आ.संदिप भैय्या राष्ट्रवादी सोबत राहिले, या दरम्यानच्या काळात त्यांना काही जणांनी संदिप भैय्यांना राष्ट्रवादीपासून दुर लोटण्याचा प्रयत्न केला, मात्र संदिप क्षीरसागर राष्ट्रवादीपासून दुर गेले नाहीत, यावेळी त्यांनी स्वत:ची ताकत सिध्द करून दाखविली, स्वबळावर 22 नगरसेवक, 7 पंचायत समिती सदस्य आणि तीन जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. कोणाचेही पाठबळ नसतांना सोबतीला जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हा मोठा विजय आ.संदिप भैय्यांनी खेचून आणला होता. भैय्यांच्या या विजयामुळे विरोधक पुर्णपणे उघडे पडले, त्यानंतर खुद्द शरद पवारांनीच संदिप भैय्यांना खंबीरपणे साथ देवून त्यांना निवडून आणले, विरोधकांचा पराभव झाला आणि संदिप भैय्या पुन्हा एखदा बीड मतदार संघातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. ते दरवर्षी शिवजयंती, भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात, यावेळी काढलेली मिरवणूक संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेते.

Exit mobile version