Site icon लोकाशा-बंब न्यूज

अखेर सुर्यमंदिर संस्थानाच्या मठाधिपतीला अटक

गेवराई -बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तथा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कोळगाव येथील सुर्यमंदीर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन दिवसापूर्वी फेटाळ्यानंतर अखेर गुरुवारी (दि.२६) गेवराईचे उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्या पथकाने हनुमान महाराज गिरीला ताब्यात घेतले आहे.थोड्यावेळात आरोपीला गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाळ लैंगिक अत्याचार अप्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदरील महाराज फरार झाला होता. दोन दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केल्यानंतर हा जामीन फेटाळण्यात आला.यानंतर गुरुवारी पोलिसांनी महाराजाला ताब्यात घेतले आहे. गेवराईच्या न्यायालयात थोड्यावेळात हनुमान गिरीला घेऊन जाण्यात येईल अशी माहिती चकलांबा पोलीसांनी दिली आहे.

Exit mobile version