Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा भाजपाच्या मध्यस्तीने अशोक करे यांनी उपोषण सोडले

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र मस्के ,जिल्हा सरचिटणीस ऍड . सर्जेराव तांदळे , संघटन सरचिटणीस प्रा . देविदास नागरगोजे ,कृष्णा तिडके यांनी आज धारूर तालुक्यातील सुरणरवाडी येथील कार्यकर्ते अशोक करे याचे उपोषण सोडले .सुरणरवाडी येथे झालेल्या रस्त्यांच्या बोगस कामाची चौकशी करण्यासाठी अशोक करे हे उपोषणास बसले होते . जिल्हा परिषद बादकाम विभाग दोनचे कार्यकारी अभियंता हळीकर साहेब याची भेट घेऊन सदर कामाच्या चौकसीचे आश्वासन दिल्यानंतर भाजपा पदाधिकाऱयांच्या व उपअभियंता सुरवसे याच्या उपस्थितीत अशोक करे यांनी उपोषण सोडले .

Exit mobile version